पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC bank election) ७ जागांवरील आज मतमोजणी होत असून मुळशीचा पहिला निकाल हाती आला आहे. मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (Atmaram Kalate) यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे (Sunil Chandore) यांनी गुलाल उधळला आहे. चांदोरे यांना २८ मत मिळाली, तर कलाटे यांची गाडी १७ वरचं थांबली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर ७ जागांसाठी २ तारखेला मतदान पार पडले होते. यात मुळशी तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादीचे भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे आणि सलग २२ वर्षे संचालक राहिलेले आत्माराम कलाटे हे एकमेकांविरोधात रिंगणात होते. त्यात चांदेरे यांना राष्ट्रवादीने पाठींबा देवून पॕनलमध्ये घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून उडी मारून शिवसेनेत गेलेले तसेच अंतिम क्षणी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविलेले आत्माराम कलाटे हे वैयक्तिक पातळीवर झगडत होते. तथापि निवडणुकीचा चार वेळेचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनाही विजयाची खात्री होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशामुळे मुळशीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते चांदेरे यांच्यासाठी मत गोळा करण्यात रात्रीचा दिवस करून पळत होते.
तथापि राष्ट्रवादीतील काही वरीष्ठ मंडळी मात्र कलाटे यांच्यासाठी पडद्याआडून प्रयत्न करीत होते. दोन्ही बाजूने प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत साम-दाम- दंड-भेद या प्रवृत्तीचाही वापर झाला. मतदारांनीही काही दिवस निसर्ग ठिकाणी फिरून पर्यटनाचा आणि मद्यासह शाकाहारी, मांसाहारी खाद्यावर ताव मारण्याचा आनंद लुटला. मतदारांचे खिसेही गरम झाले होते. काही प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा वापर झाला. आपल्या बाजूचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी विविध प्रकारचे राजकारण रंगले. मात्र अखेरीस कलाटे यांना धक्का देत सुनील चांदोरे यांनी गुलाल उधळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.