Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (PDCC) आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत बँक सुरू असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर टाकला होता. ही बँक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली येत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही बँक रात्रीच्या वेळी सुरू ठेवल्याचा आरोप आमदार पवार यांनी करून यावर आक्षेप घेतला होता.
बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेची शाखा सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती.असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी या बँकेचा कारभार रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवल्याचा आरोप करत याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. याची दखल घेत या बँकेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्या प्रकारणी 2024 च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक (election) विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. सोमवारी रात्री या बँकेच्या शाखेत 40 ते 50 लोक संशयतरीत्या फिरत असल्याचे CCTV मध्ये भरारी पथकाच्या निदर्शनास आल्याने बँक मॅनेजर यांच्यासह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी ही वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला होता. त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आमदार पवार यांनी जुना व्हिडिओ शेअर केला असावा, असे पवार यांनी म्हटले होते. तसेच बँकेच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून निवडणूक विभाग आणि पोलीसांनी कारवाई करावी, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हंटले होते.
दरम्यान, या बँकेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पीडीसीसी बँके बदल आम्ही जे बोललो. त्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही सहकार्य केलं नाही. त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं.188 कलम नुसार निवडणूक आयोगाने पीडीसीसी बँकेवर कारवाई केली आहे.पीडीसीसी बँकेच्या चेअरमन वर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.