Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील तु-तु-मै-मै संपण्यास तयार नाही. बारामतील लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले जात असून नागरिकांना दमदाटी केली जात असल्याचे काही व्हिडिओ आमदार रोहित पवार यांच्याकडून सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली असून रोहित पवार यांच्यावर कडाडून टीका करत त्यांच्यावर कडक शब्दात सुनावले आहे. त्याला सध्या काही उद्योग नाही, त्यामुळे हे उद्योग सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले.
बारामती लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विविध विषयांवर भाष्य करत रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली. रोहित पवारकडे सोशल मिडीयाची चांगली टीम आहे. तो विकास कामापेक्षा सोशल मिडीयामध्ये पहिल्यापासून पुढे आहे. आम्ही सगळे जेव्हा विकास कामात असायचो. तेव्हा देखील तो सोशल मिडीयावर असायचा.पहिल्यापासूनच त्याला सोशल मिडीयामध्ये इंन्ट्रेस आहे. त्याला सोशल मिडीयाचा वापर कसा करायचा हे चांगले माहित आहे. त्यामुळे त्याचा वापर करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम तो करत असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्हा बँकेबाबत तो जे आरोप करतोय. त्याने सीसीटीव्ही मध्ये चेक करावे. बँक कधीपर्यंत सुरू होती. तेथे कोण कोण आले होते. त्यातुन ते समोर येईल. तो सोशल मिडीयामध्ये इतका पोहोचलेला आहे की, हे चित्रीकरण एक ते दोन दिवसांपूर्वीचे असल्याचे तो सांगू शकतो. त्याला सध्या काही उद्योग नाही, माझ्या बद्दल केवळ वेडंवाकडं बोलणं आणि टीका करणं हेच सध्या त्याचं काम आहे. आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं, हेच त्याचं काम सध्या सुरू असतं. त्याने सोशल मिडीयामध्ये असे उद्योग यापूर्वी देखील केलेले आहेत. निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणेने याची चौकशी पार पाडावी. पारदर्शकच निवडणूका पार पाडल्या पाहिजे. आपल्या येथे शाहु-फुले-आंबेकडकरांचा वारसा आहे. त्याच विचारधारेने सर्वांनी पुढे गेले पाहिजे.
सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने गैरसमज पसरविणे हे एकमेव काम सध्या रोहित पवारांकडे आहे. सतत ट्विट करणे, व्हिडीओ शेअर करणे, हेच त्याचे काम आहे. परवाच्या सभेतच आपण सर्वांनी त्याने नौटंकी केली होती. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याचं ते कामच आहे, अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावले. मिडीयाने देखील त्याच्या आहारी जाऊ नये. तुम्हाला तो जे दाखविण्याचा प्रयत्न करतोय ते व्हिडीओ बघा. त्यातील माणसं बघा. त्यांच्याकडे जावा, त्याची शहानिशा करा आणि त्याच्या बातम्या दाखवा, असा सल्लाही अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना दिला.
मतदान कमी होत आहे, मतदानाची टक्केवारी घसरत आहे, हे बरोबरच आहे. उन्हाळा आहे, त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक बाहेर पडत नाहीत. सध्या मतांची टक्केवारी घसरली आहे, ही मात्र वस्तूस्थिती आहे. ही टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मतदारांपर्यंत आम्ही सभा, रॅली, मेळावे, यांच्या माध्यमातून पोहोचलो आहे. आता मतदारच ठरवतील ते कोणाच्या बाजुने कौल द्यायचा ते. बारामतीकर कोणाच्या बाजुने आहेत, याचा निर्णय चार जूनला होईल.
आपल्या घरी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) येऊन गेल्या हे मला माहित नाही. त्या माझ्या घरी येऊन गेल्या तरी बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्बेत काही प्रमाणात बिघडली आहे, यावर बोलताना अजितदादा म्हणाले की, त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तींना काहीतरी वाटायला पाहिजे. त्यांनी साहेबांना समजावून सांगितले पाहिजे की, तब्बेतीची काळजी घ्या. पण त्यांच्या जवळचे इतके 'पोहचलेले' आहेत की, तेच म्हणत असतील, साहेब आम्हाला एक सभा द्या. प्रत्येकजण स्वार्थी आहे. त्यांना काही त्याचं घेणेदेण पडलेलं नाही. साहेब म्हणतात सर्व कुंटूब माझ्या बरोबर आहे. तीन कुटूंब, मग त्यांनी तरी त्यांना सांगायला पाहिजे की, तब्बेतीची काळजी घ्या. आपली तब्बेत महत्वाची आहे. परंतू ते पण सर्व स्वार्थी आहेत. तेच त्यांना सर्व ठिकाणी फिरवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.