नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर सतत वाढ होत होती. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत 9 राज्यांनी अधिभारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने राज्यांना देखील पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यांनी व्हॅट कमी केला तर नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
केंद्राच्या या निर्णयानंतर विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेल्या उत्तर प्रदेश, गोव्यासह बिहार, गुजरात, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, उत्तराखंड आणि कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणारं एक्साईज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्क अधिभार कमी करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रा शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकातही राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यासाठी इंधनावर आकारण्यात येणारा वॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 7 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्या शहरात पेट्रोल किती दर आहेत आणि सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल किती आहे हे जाणून घ्या.
पेट्रोलचे आजचे (४ नोव्हेंबर) दर
पुणे - 115.66
मुंबई - 115.85
नागपूर - 115.65
नांदेड - 118.63
नंदुरबार - 116.35
नाशिक - 116.06
उस्मानाबाद - 116.81
पालघर - 116.07
परभणी - 118.16
रायगड - 116.35
रत्नागिरी - 117.89
सांगली - 116.04
सातारा - 116.35
सिंधुदुर्ग - 116.67
सोलापूर - 116.58
ठाणे - 115.69
वर्धा - 116.13
वाशिम - 116.47
यवतमाळ - 117.18
अहमदनगर - 116.06
अकोला - 115.58
अमरावती - 116.96
औरंगाबाद - 117.37
भंडारा - 116.21
बीड - 116.76
बुलढाणा - 115.87
चंद्रपूर - 116.65
धुळे - 115.51
गडचिरोली - 117.06
गोंदिया - 117.39
बृहन्मुंबई (ग्रेटर मुंबई) - 115.85
हिंगोली - 116.89
जळगाव - 116.08
जालना - 117.41
कोल्हापूर - 115.91
लातूर - 116.64
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.