प्रतिक धुमाळ, शिवाजीराव आढळराव पाटील सरकारनामा
पुणे

तीन हजाराची लोकवस्ती; पण या गावात तुम्हाला IAS, IPS सह इतर अधिकाऱ्यांची घरे दिसतील..

शिवाजीराव आढळराव-पाटील हे मुळचे धुमाळचेच. त्यामुळे पिंपळे-धुमाळ (Pimple Dhumal) हे आपलेच गाव असल्याचे आढळराव मानतात.

भरत पचंगे

शिक्रापूर : युपीएससी परीक्षेत एकाच गावातील १४ जण प्रशासकीय सेवेत असल्याने हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शालेय शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी सर्वाधिक विद्यार्थ्यांना यश मिळाल्यानंतर आता प्रशासकीय सेवेतही शिरुर तालुक्यातील पिंपळे-खालसा (पिंपळे-धुमाळ) (Pimple Dhumal) या गावाने मोहर उमटवली आहे. शिष्यवृत्ती गुणवत्तेसाठी प्रसिध्द हे गाव आता प्रशासकीय अधिका-यांचे गाव म्हणून ओळखलं जातं.

युपीएससी परीक्षेत देशात १८३ वा क्रमांक पटकाविणाऱ्या प्रतिक अशोकराव धुमाळ यांचा सत्कार शिवसेनेचे नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रतिक धुमाळ हा अकरावा प्रशासकीय अधिकारी झाला आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील हे मुळचे धुमाळचेच. त्यामुळे पिंपळे-धुमाळ (Pimple Dhumal) हे आपलेच गाव असल्याचे आढळराव मानतात. आढळरावांनी प्रतिक धुमाळच्या घरी जावून त्यांचा सत्कार केला.

हे आहेत प्रशासकीय सेवेत दाखल झालेले पिंपळेकर-धुमाळ

रमेश मल्हारी धुमाळ (सन २००९, सध्या सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई), सुप्रिया शहाजी धुमाळ (सन २०११, सध्या पोलिस निरीक्षक, नागपूर ग्रामीण), सचिन शहाजी धुमाळ (सन २०१२, सध्या पोलिस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता), मिथून तान्हाजी धुमाळ (सन २०१२, वरिष्ठ वैज्ञानिक, कृषी मंत्रालय, दिल्ली), नीलम बाळासाहेब धुमाळ (सन २०१३, विक्रीकर निरीक्षक, पुणे), डॉ. श्रीधर तान्हाजी धुमाळ (सन २०१४, उपायुक्त, कस्टम, मुंबई), रुपाली रावसाहेब धुमाळ (सन २०१६, महिला व बालविकास अधिकारी, पालघर), नचिकेत विश्वनाथ शेळके (सन २०१८, आयपीएस, १६७ रॅंक, हैदराबाद पोलिस अकादमी), सागर विलास धुमाळ (सन २०१८, पोलिस निरीक्षक, नवी मुंबई), ज्ञानेश्वर खंडेराव धुमाळ (सन २०२०, पोलिस उपनिरीक्षक, नाशिक), प्रतिक अशोकराव धुमाळ (युपीएससी-१८३ रॅंक).

धुमाळांच्या तीन सुनाही प्रशासनात सेवत

अस्मिता भगवान धुमाळ (सन २०१३, सहायक आयुक्त, पुणे महापालिका), सुप्रिया धुमाळ (सन २०१६, सहायक संचालक, कोकण भवन, मुंबई), निधी नचिकेत (सन २०१९,आयएएस, उपजिल्हाधिकारी गुंटूर, आंध्रप्रदेश)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT