मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काल गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांची दिल्ली येथे भेट घेतली. सोमय्या यांनी नुकताच कोल्हापूर दैारा केला होता. या दैाऱ्यात कोल्हापूर पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीबाबत मिश्रा यांना त्यांनी माहिती दिली. ''आपल्याला बेकायदा थांबविले,'' अशी तक्रार मिश्रा यांच्याकडे सोमय्यांनी यावेळी केली.
''कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी माझ्यावर गनिमी कावा करुन हल्ला होणार असे म्हटले होते. परंतु त्यासंबंधात कट कारस्थान करणाऱ्यांवर कारवाई का नाही,'' अशी विचारणा सोमय्यांनी केली आहे. याबाबतची माहिती सोमय्यांनी टिवट् वरुन दिली आहे.
किरीट सोमय्यांनी हे रोज नवीन आरोपांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करत असतात. आता मात्र त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर नजर वळवली आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. नांगरे हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम असल्याची टीका त्यांनी केली आहे.
राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शक्यतो टीका करत नाहीत. मात्र सोमय्या यांच्या टिकेमुळे प्रशासनातही चुळबूळ सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नांगरे पाटील यांना मुंबईतील महत्वाचे पद मिळाले. मुंबईच सहपोलिस आय़ुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. मुंबई पोलिस आयुक्तांनंतर हे पद महत्वाचे असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.