BJP Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad BJP : पिंपरी चिंचवड भाजप जम्बो कार्यकारिणी जाहीर; कुणाचा पत्ता कट, कुणाची वर्णी?

Shankar Jagtap : उद्योगनगरी भाजपमध्ये जगताप गटाचा वरचष्मा

उत्तम कुटे

Pune Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी १९ जुलै रोजी राज्यातील आपले ५३ जिल्हाध्यक्ष एकाचवेळी जाहीर केले होते. त्या जिल्हाध्यक्षांनी आता दोन महिन्यानंतर आपापल्या कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरवात केली आहे. त्यात पिंपरी-चिंचवडची १२९ जणांची जंबो कार्यकारिणी अध्यक्ष शंकर जगताप यांनी रविवारी जाहीर केली. या कार्यकारिणीतून पक्षांतर्गत विरोधकांना वगळल्याचे दिसून आले आहे. (Latest Political News)

नव्या कार्यकारिणीत जगतापांनी जुने, नवे आणि तरुण आणि अनुभवींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाज घटक आणि जातींचाही त्यात विचार करण्यात आला आहे. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचा विचार करून ती केली गेली आहे. जुन्या कार्यकारिणीतील राजू दुर्गेंसारख्या काहींचे प्रमोशन झाले आहे. त्यांना सरचिटणीस पदावरून वरिष्ठ उपाध्यक्ष करण्यात आले आहे. यात प्रवक्तेपदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. तर, मधुकर बच्चेसारख्यांना सचिव पदावरच कायम ठेवल्याने ते नाराज झाले आहेत. दीपक मोढवे यांनाही पुन्हा ट्रान्स्पोर्ट सेल अध्यक्षपदच दिले गेले आहे. (Maharashtra Political News)

शंकर जगताप हे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे दीर आहेत. त्यामुळे शहरातील भोसरी आणि पिंपरी या इतर दोन विधानसभा मतदारसंघापेक्षा चिंचवडचा वरचष्मा नव्या कार्यकारिणीत दिसतो आहे. या कार्यकारित जगताप गटाचा वरचष्मा दिसून येत आहे.

शंकर जगताप यांच्या अध्यक्षपदाला विरोध केलेले जुन्या कार्यकारिणीतील संघटन सरचिटणीस अमोल थोरात आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटेंसारख्यांना नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. संघटन सरचिटणीस हे पदच भाजपने आता रद्द केले आहे.

पूर्वी पाच सरचिटणीस होते. आता त्यात एकने भर टाकण्यात आली आहे. तर, दहा चिटणीस केले आहेत. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सुजाता पालांडे यांना नेमण्यात आले आहे. त्या राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी ही महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. विविध प्रकोष्ठ आणि सेल अध्यक्षही नेमण्यात आले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT