Pimpri Chinchwad NCP : शरद पवार राष्ट्रवादीत तरुणाईचे नवे पर्व; आता रोहित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणार?

Rohit Pawar And Tushar Kamthe : तुषार कामठे यांच्यापुढे उद्योगनगरीत राष्ट्रवादी उभी करण्याचे मोठे आव्हान
Tushar Kamthe, Rohit Pawar
Tushar Kamthe, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित फूट आणि बंडानंतर अडीच महिन्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी तुषार कामठे यांची रविवारी नियुक्ती झाली. सात महिन्यांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या कामठेंच्या या नियुक्तीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. दरम्यान, या नेमणुकीतून तरुणाईचे नवे पर्व शरद पवार राष्ट्रवादीत उद्योगनगरीमध्ये सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या पक्षाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार हे आगामी काळात शहरात लक्ष घालणार असल्याचे संकेतही यातून मिळाले आहेत. (Latest Political News)

कामठेंच्या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Sharad Pawar) शरद पवार राष्ट्रवादीकडे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये अध्यक्ष म्हणून एकनिष्ठ लायक, पात्र व्यक्ती नाही का? या चर्चेमुळे त्यांना काही महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या कामठे यांना जबाबदारी देण्याची वेळ आली. या नियुक्तीमुळे पक्षातील फुटीनंतर सत्ता भोगलेल्या अनेकांनी शरद पवारांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील गत टर्ममधील सुलक्षणा शिलवंत-धर यांचा अपवाद वगळता सगळेच माजी नगरसेवक अजित पवार राष्ट्रवादीत गेले आहेत. अजित पवारांमुळे त्यांना पुन्हा नगरसेवक होण्याची आशा आहे. तसेच राज्यातील सत्ताही पुढील वर्षभर त्यांना उपयोगी पडणार आहे.

Tushar Kamthe, Rohit Pawar
Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; सलाइन लावण्याची वेळ...

भाजपमधून आलेल्या कामठेंना शहराध्यक्षपदाची जबाबदारी पेलताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. शहरातील तीनपैकी पिंपरीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडेसारखे ज्येष्ठ नेते, माजी महापौर, बहुतांश पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी अजितदादांची साथ दिली आहे. त्यामुळे उद्योगनगरीत राष्ट्रवादीची धूळधाण झालेली असताना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या गटाचे अस्तित्वच नाही, तर ताकदही दाखवून द्यावी लागणार आहे. त्यात मोठा अडथळा हा भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीचा आहे. (Maharashtra Political News)

गतवेळी पालिकेत सत्तेत असलेली भाजप व विरोधातील राष्ट्रवादी आता एक झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात महायुतीची मोठी ताकद निर्माण झालेली आहे. त्यांच्याकडे शहरातील तिन्ही आमदार (भाजपचे भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडच्या अश्विनी जगताप, तर अजित पवार गटाचे बनसोडे), शंभरेक माजी नगरसेवकांची फौज आहे. त्यांच्यापुढे निभाव धरण्यासाठी तुषार कामठे (Tushar Kamthe) व त्यांच्या नव्या टीमला जोमाने तयारी करावी लागणार आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे तरुण आणि अनुभवी आहेत. त्यांना शरद पवार गटाचे नव्या दमाचे आणि नगरसेवकपदाची एक टर्म अनुभवलेले कामठे हे कशी टक्कर देतात, याची उद्योगनगरीत उत्सुकता आहे.

Tushar Kamthe, Rohit Pawar
Nana Patole Vs Eknath Shinde : जरांगेंच्या उपोषणावर नाना पटोलेंना संशय, तर मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला...

दरम्यान, अध्यक्षपद नियुक्तीसाठी सांगोपांग विचार झाला, वेळ लागला, तसा तो कामठेंच्या कार्यकारिणीलाही लागण्याची शक्यता आहे. ती कशी असेल, यावर कामठेंच्या टीमची कामगिरी आगामी महापालिकेत दिसणार आहे. तसेच, लोकसभा निवडणूक मुदतपूर्व आणि महापालिका निवडणुकीपूर्वी झाली, तर त्यातही आपला ठसा त्यांना उमटवावा लागणार आहे. कामठेंच्या नेमणुकीचा थोडा फटका हा भाजपला त्यातही चिंचवडमध्ये बसणार आहे. तेथील पिंपळे निलख या भागातून (प्रभाग १६ ब) कामठे निवडून आले आहेत. तेथे त्यांचा प्रभाव आहे. तसेच त्यांचा आक्रमक स्वभाव आणि लढण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या पक्षाला फायदा होणार आहे. याचा मोठा फटका अजित पवार गटाला चिंचवडला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Tushar Kamthe, Rohit Pawar
CM Eknath Shinde Press : मुख्यमंत्र्यांचेही `नमो नमो`; मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अभियान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com