Laxman Jagtap passed away  sarkarnama
पुणे

Laxman Jagtap passed away : जगतापांच्या अंत्ययात्रेला लोटला हजारोंचा जनसागर; लक्ष्मण भाऊंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Laxman Jagtap passed away : आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर

सरकारनामा ब्यूरो

Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर जिल्हा भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय ६०) यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने आज (ता.३) सकाळी निधन झाले. सायंकाळी शहरातील पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या शेतात त्यांच्यावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसागर लोटला होता.

जगताप यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, दोन मुली, दोन भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक शंकर जगताप आणि उद्योजक विजय जगताप हे त्यांचे बंधू होत. शहरातील सर्वपक्षीय आणि राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) अंत्यसंस्काराला हजेरी लावली.

Laxman Jagtap passed away

त्यांचे व्याही (बंधू विजय जगतापांचे) आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे, भोसरीचे माजी आमदार आणि आमदार जगतापांचे नातेवाईक विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदींसह १५ ते वीस हजारांची उपस्थिती त्यांच्या अंत्यसंस्काराला होती.

दुपारी आमदार जगतापांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यावेळी शेकडोंनी त्यांचे शेवटचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार उमा खापरे आदींनी जगतापांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT