Pimpri Chinchwad Municipal Corporation Sarkarnama
पुणे

PCMC officers : आयुक्त शेखर सिंह यांचा PCMC च्या अतिरिक्त आयुक्तांसह 34 अधिकाऱ्यांना मोठा दणका!

Show cause notice to PCMC officers : पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांसह 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यानुसार विभाग नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

Jagdish Patil

Pimpri Chinchwad News, 18 Mar : पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांसह 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. पालिकेत येणाऱ्या नागरिकांना भेटीसाठी ठरवण्यात आलेल्या आठवड्यातील 3 दिवसांच्या वेळेत गैरहजर राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC) तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. मात्र, तरीही नागरिकांची कामे व्हावीत यासाठी कार्यालयातील अधिकारी गैरहजर राहू नयेत. त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे वाया जाऊ नयेत. यासाठी नागरिकांसाठी भेटीची वेळ देण्याची आणि त्यासाठी नोंद वही ठेवण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शिवाय अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटण्यासाठीचं वेळापत्रक देखील आयुक्त सिंह यांनी तयार केलं आहे. ठरवलेल्या कालावधीत विभाग अंतर्गत बैठका, प्रकल्प भेटीचे आयोजन करू नये आणि भेटीचा कालावधी सूचना फलकांवर ठळकपणे प्रदर्शित करावा. तसंच सर्व पालिकेत येणाऱ्या लोकांचं म्हणणं एकूण घेऊन त्यांच्या तक्रारींचं लवकरात लवकर निराकारण करावं आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतरच कार्यालयातून जावं, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.

मात्र, नागरिकांसाठी राखीव ठेवलेल्या वेळेत जवळपास 34 अधिकारी पालिका कार्यालयात गैरहजर राहिल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाच्या पाहणीत उघडकीस आलं आहे. याबाबत दहा दिवसांचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

यामध्ये 34 अधिकारी एकपेक्षा जास्त वेळा गैरहजर राहिलल्याचे समोर आल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विभाग नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

गैरहजर अधिकारी पुढीलप्रमाणे -

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त मनोज लोणकर, सचिन पवार, पंकज पाटील, अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहायक आयुक्त अमित पंडीत, महेश वाघमोडे, मुकेश कोळप, बाबासाहेब गलबले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील.

मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त तानाजी नरळे, उमेश ढाकणे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय खाबडे, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आयुक्त अविनाश शिंदे, शितल वाकडे, महेश काळे, अजिंक्य येळे, विजय थोरात, माणिक चव्हाण, सुचिता पानसरे, श्रीकांत कोळप, किशोर ननावरे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT