
Mumbai News : नागपूर शहरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. ज्यात प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती. पण मुस्लिम धर्मातील मजकूर जाळण्यात आल्याच्या अफवेमुळे येथे दोन गटांमध्ये मोठा हिंसाचारात झाला. ज्यात 34 पोलीस जखमी, ५ नागरिकांना जबर मार आणि 45 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही वाहने जाळ्यात आली. याच घटनेत एका डीसीपींवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.18) विधानसभेत दिली. नागपूर दंगल प्रकरणी निवेदन सादर करताना ही माहिती त्यांनी दिली असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे.
नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी रात्री (ता.17) मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता असून शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे. तर कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथे संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तर या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.
या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत या घटनेचे निवेदन सादर केले. यावेळी फडणवीस यांनी, घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले होते. तर गवताची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. पण यावेळी कापडावरील धार्मिक मजकूर जाळण्यात आल्याची अफवा पसरवली गेली. ज्यामुळे मोठा हिंसाचार झाला. याच्याआधी पोलिसांनी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच कारवाई केली जात असतानाच हंसापुरी भागांमध्ये 200 ते 300 लोकांच्या जमावाने उपद्रव माजवला. त्यांनी दगडफेक करत 12 दुचाकीचे नुकसान केले. घातक शस्त्राने काही लोकांवर हल्ला करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
तर सकाळी झालेल्या घटनेनंतर संध्यााकाळी पुन्हा वाद सुरू झाला. पण यामधल्या काळात सगळं शांत असतानाच नियोजीत कट रचून हा हिंसाचार करण्यात आला. भालदार पुरा भागात 80 ते 100 लोकांच्या जमावाने दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने जाळली. ज्यामुळे पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. यासंपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले असून तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस जखमी झाल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याच घटनेत एका एका डीसीपींवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. यामुळे असा पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा असला तरीही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. या घटनेत जाणीव पूर्वक सुनियोजित पॅटर्न रावला असून जवळपास एक ट्रॉलीभर दगडांचा वापर करण्यात आला आहे. धारधार शस्त्रांचा वापर करून काही ठराविक घरं, काही ठराविक स्थापनांना लक्ष करण्यात आले असून लोक जखमी झाले आहेत.
त्यामुळे या कटात जे असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. तर पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना सोडलं जाणार नाही, अशा पुन्हा एकदा उल्लेख करत हिंसाचार करणाऱ्यांना फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
तर फडणवीस यांनी पोलिस शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत असून पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. आपल्या सर्वांची महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, शांतता निर्माण करण्याची जबाबदारी आहे. यामुळे मी नागपुरातील जनता असेल किंवा महाराष्ट्रातील जनता या सर्वांना विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक कार्यक्रम या कालावधीत सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवावा, कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल एकमेकांच्या प्रति आदरभाव कसा राखयचा आहे, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.