Congress Agitation against Narendra Modi in Pune
Congress Agitation against Narendra Modi in Pune Sarkarnama
पुणे

काँग्रेसने केले `मोदी, शर्म करो` आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महाराष्ट्र कॉंग्रेसने परप्रांतीयांना ट्रेनमधून त्यांच्या गावी पाठवल्याने देशभर कोरोना पसरला, असे वक्तव्य मंगळवारी (ता.८ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केल्याने लोकसभाच (Loksabha) नाही, तर देशभर गदारोळ झाला आहे. त्यातून बुधवारी (ता.९ फेब्रुवारी) राज्यात भाजपच्या कार्यालयांबाहेर महाराष्ट्राचा अवमान करणारे विधान केल्याबद्दल कॉंग्रेसने त्यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. पिंपरी चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) ते झाले. संसदेसारख्या पवित्र ठिकाणी महाराष्ट्राचा अपमान केल्याने मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी केली. भाजपच्या (BJP) राज्यातील खासदार, आमदार, नगरसेवकांनी त्यांच्यात राज्याप्रती स्वाभिमान असेल, तर राजीनामे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. (Congress Agitation against Narendra Modi in Pune)

कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवाबंद करावी, अशी मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करीत मोदींनी ही सेवा सुरु ठेवली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये ‘नमस्ते इंडीया’ हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे देशात कोरोनाचा फैलाव होण्यास महाराष्ट्र कॉंग्रेस नाही, तर मोदींचे 'इवेन्ट' आणि त्यांची चुकीची धोरणे जबाबदार आहेत, असा हल्लाबोल डॉ.कदम यांनी केला.

डॉ.कदम म्हणाले, मागील सात वर्षातील आपले अपयश झाकण्यासाठी मोदी हे कॉंग्रेस आणि महाराष्ट्रावर बेताल आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले. मोदी व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील कोट्यावधी नागरीकांनी शहरे सोडून मुळगावी स्थलांतर केले. त्यामध्ये हजारोंचा बळी गेला, असा हल्लाबोल त्यांनी केला. मोरवाडी, पिंपरी येथील भाजपच्या शहर कार्यालयासमोर सायंकाळी केलेल्या 'मोदी, शर्म करो` आंदोलनात ते बोलत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला. महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, प्रियांका मलशेट्टी, लक्ष्मण रुपनर, हिरा जाधव, छाया देसले आदी य आंदोलनात सामील झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT