सुप्रिया सुळे म्हणाल्या, श्वास कोंडला असून संकट आपल्या दारात येऊन उभे आहे

राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टीका केली आहे.
Supriya Sule, PM Narendra Modi
Supriya Sule, PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : कर्नाटकमधील हिजाबच्या वादावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रातील (Central Government) सत्ताधारी भाजपला (BJP) लक्ष्य करताना भाजपची नैतिक फौजदारी आणि वैचारिक फौजदारी सुरू असल्याचा प्रहार आज (ता.9 फेब्रुवारी) लोकसभेत केला. तसेच, उद्योजक घराण्यांचे ५० वर्षातील योगदानाचा अनादर करू नका, असा खोचक सल्लाही सरकारला दिला.

Supriya Sule, PM Narendra Modi
पवित्र गंगा जीवनदायिनी की शववाहिनी?, 'नमामि गंगे' वरून केतकरांचे टीकास्त्र

सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून झालेल्या गदारोळाचा मुद्दा उपस्थित केला. कोणते कपडे हेच ठरविणार. काय खायचे, कुठे कधी जायचे हेच ठरविणार, काय बोलायचे काय नाही बोलायचे, काय शेअर करायचे काय फॉरवर्ड करायचे हेच ठरविणार. याला हुकूमशाही म्हणायचे तर, आणीबाणीचा राग आमच्यावर काढणार. यांच्यावर टिका केली तर देशद्रोहाचा खटला टाकणार. लोकशाहीसाठी आंदोलन केले तर आम्हाला आंदोलनजीवी म्हणून हेटाळणार. लोकहो आता तुम्ही काय करणार? श्वास कोंडला असून संकट आपल्या दारात येऊन उभे आहे, अशा मराठी ओळी सादर करून सुप्रिया सुळे यांनी या घटनाक्रमावरील अस्वस्थता व्यक्त केली.

Supriya Sule, PM Narendra Modi
काँग्रेसने भाजपला चकवले अन्...

राजकीय घराणेशाहीवरून भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांना टोला लगावताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या राजकीय पार्श्वभूमीचा अभिमान व्यक्त करताना प्रितम मुंडे, पूनम महाजन, हिना गावित रक्षा खडसे, सुजय विखे पाटील, केंद्रातील मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीचाही उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. तर, विप्रो. सिप्ला, इन्फोसिस किर्लोस्कर अंबानी बजाज, वालचंद समूह, फिरोदिया, पुनावाला कल्याणी धूत अशा कंपन्यांचे मागील ५० वर्षात मोठे योगदान आहे. या उद्योजक घराण्यांनी शून्यातून संपत्तीचे आणि रोजगाराचे निर्माण केले हे विसरू नका आणि त्यांचा अनादर करू नका, असा सल्ला देत मोदींच्या सत्तेआधीही देशात उद्योगविश्व विस्तारल्याचा दाखला देत भाजपला फटकारले.

दरम्यान, महाराष्ट्राची केंद्राकडे जीएसटी भरपाईची २८ हजारहून कोटीहून अधिक रकमेची थकबाकी असल्याचे सांगताना ही रक्कम कधी मिळणार, अशी विचारणाही सुळे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com