Maval Lok Sabha Constituency 2024 Sarkarnama
पुणे

Pimpri News: "भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा" मतदानाच्या तोंडावरच दिवंगत आमदारांच्या समर्थकांनी लावले बॅनर

Maval Lok Sabha Constituency 2024: जगताप आणि बारणे राजकीय शत्रू होते, त्यामुळे जगतापांचे समर्थक महायुतीचे उमेदवार असलेल्या बारणेंवर नाराज आहेत. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी हे बॅनर जगतापांच्या समर्थकांनी लावले असल्याची चर्चा आहे.

Mangesh Mahale

शिवसेनेचे खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barne) आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) याच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे. बारणे हे महायुतीचे उमेदवार आहे. एकेकाळी त्यांच्या विरोधात प्रचार करणारे जगतांपाच्या समर्थकांची कोंडी झाली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maval Lok Sabha Constituency 2024) पिंपरी परिसरात लावलेले बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. जगताप यांच्या निनावी समर्थकांनी हे बॅनर लावले आहे."भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा," अशा आशयाचे बॅनर आहे.

जगताप आणि बारणे राजकीय शत्रू होते, त्यामुळे जगतापांचे समर्थक महायुतीचे उमेदवार असलेल्या बारणेंवर नाराज आहेत. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी हे बॅनर जगतापांच्या समर्थकांनी लावले असल्याची चर्चा आहे. काही काळानंतर हे बॅनर फाडण्यात आले, त्यामुळे परिसरात तणाव होता. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीची पराभवाची सल अद्यापही लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे. ज्या भागात ही बॅनर बाजी करण्यात आली आहे. त्या परिसरातून जगतापांना मतदारांनी नेहमी मोठी लीड दिली आहे. त्यामुळे या बॅनरबाजीचा परिणाम या निवडणुकीवर होणार का हे चार जूनलाच कळेल. लक्ष्मण जगताप यांची पत्नी आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू तसेच भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप हे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT