PCMC News Sarkarnama
पुणे

PCMC Mayor Election: पिंपरी-चिंचवडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; भाजपने दिलेले उपमहापौरपद नाकारून नगरसेवकाचा पालिकेतून काढता पाय

Pimpri Chinchwad Mayor Election 2026 News: उपमहापौरपदाबाबत नाट्यमय घडामोडी घडल्या. सलग ३ वेळा निवडून आलेले नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी नाकारत महापालिकेतून काढता पाय घेतला.

सरकारनामा ब्यूरो

PCMC Election News: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची शिफारस केली. काल (सोमवारी) त्यांचा एकमेव अर्ज नगरसचिवांकडे दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याची औपचारिक घोषणा शुक्रवारी (ता. ६) निवड प्रक्रियेच्या दिवशी होईल.

त्याचवेळी उपमहापौरपदाबाबत नाट्यमय घडामोडी घडल्या. सलग ३ वेळा निवडून आलेले नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी नाकारत महापालिकेतून काढता पाय घेतला.

ऐनवेळी ज्येष्ठ नगरसेविका शर्मिला बाबर यांचे नाव पुढे आले आणि त्यांनी नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी दाखल केला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे.

शिंदे यांचे नाराजीनाट्य

उपमहापौरपदासाठी सलग ३ वेळा भाजपच्या उमेदवारीवर एकमेव निवडून आलेले शीतल ऊर्फ विजय शिंदे यांचे नाव रवींद्र चव्हाण यांनी कळविले होते. मात्र, उपमहापौरपद नाकारून शिंदे यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला.

त्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक होते. शिंदे यांनी नकार दिल्याने ऐनवेळी कोणाचे नाव सुचवायचे व अर्ज दाखल करायचा? असे प्रश्न उपस्थित झाले. अखेर प्रभाग १५ मधून निवडून आलेल्या नगरसेविका शर्मिला बाबर यांचे नाव पुढे आले. त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शुक्रवारी निवड

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडूनही अर्ज महापालिकेत १२८ पैकी ८४ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

मात्र, महापौरपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे भाजपचा महापौर बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी (ता. ६) महापौर व उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT