Pimpri Chinchwad Corporation Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad Politics : सरकारनामा इम्पॅक्ट! थेट मोदींकडे तक्रार झाल्याने पालिकेचे सुस्त प्रशासन झाले जागे

Pimpri Chinchwad Corporation On Illegal Tree Cutting : पंतप्रधान मोदींकडे तक्रार होताच कारवाई सुरू...

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri Chinchwad Latest News :

वाढते नदीप्रदूषण आणि बेकायदा वृक्षतोड यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पर्यावरणमंत्री नियुक्त करा व झाडांच्या रक्षणासाठी दिल्लीहून आदेश द्या, या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे केलेल्या उपरोधिक मागणीची बातमी काल (ता. 17) सरकारनामात प्रसिद्ध होताच पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन लगेच अॅक्शन मोडवर आले.

बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांना महापालिकेने कारवाईचा इशारा दिला. याप्रश्नी सोशल मीडियातून केवळ मोदींना साकडे घालण्यात आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाल्याने मोदी है, तो मुमकीन है, अशी चर्चा शहरात आज रंगली.

विशेषतः होर्डिंग्ज लावण्यासाठी झाडांवर चालविण्यात येणाऱ्या कुऱ्हाडीच्या शंभरावर तक्रारी उद्योगनगरीतील वृक्षप्रेमींनी गेल्या वर्षभरात केल्या होत्या. पण त्याची दखलच महापालिका प्रशासनाने न घेतल्याने त्यांनी थेट मोदींना सोशल मीडियातून नुकतेच वरील साकडे घातले. त्याची बातमी काल सरकारनामाने व्हायरल करताच प्रशासन खडबडून जागे झाले. कारवाईचा बडगा पिंपरी-चिंचवड पालिकेने उगारला.

दिल्ली (मोदी तथा केंद्र सरकार) आणि राज्य सरकारकडून तंबी मिळण्याअगोदर लगेच प्रसिद्धीपत्रक काढण्याची खबरदारीही घेतली. दरम्यान, बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाई करण्यासाठी PM मोदींना केलेल्या आवाहनात पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांचा मोबाईल नंबर देण्यात आल्याने प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेतल्याचे समजले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालिका प्रशासनाकडून 7 होर्डिंगधारकांचे परवाने रद्द

वारंवार बेकायदा वृक्षतोड होर्डिंग्जधारकांकडून होत असल्याची कबुली पिंपरी पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात दिली. त्याबद्दल 7 होर्डिंगधारकांचे परवाने रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अवैध वृक्षतोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगळवारी (ता. 16) शहरात चिखलीमध्ये झालेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगत अशा आणखी नऊ तक्रारी विविध पोलिस देण्यात आल्याचे त्यात पुढे म्हटले आहे. या प्रशासनाच्या कबुलीतूनच शहरात अवैध वृक्षतोड किती मोठ्या प्रमाणात होत असून त्यातून पर्यावरणाला कसा धोका पोहोचत आहे, याला स्पष्ट दुजोरा मिळाला आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT