Pimpri News: 'घोड्या पेक्षा नाल महाग' अशी एक म्हण आहे. याची प्रचिती पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या एका 'कारभारा'ने आली. कारण सांगवी-बोपोडी पूल बांधण्यासाठी ३० कोटी तर सुशोभीकरण, विद्युत रोषणाईवर २२ कोटी खर्च करण्यात आला आहे. सध्या पालिकेचा कारभार पाहिला असता "आंधळे दळते कुत्रं पीठ खाते" असेच चित्र आहे.
नागरिकांच्या कररूपाने गोळा केलेल्या पैशांची सत्ताधारी व प्रशासनाकडून कशी उधळपट्टी करतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका आहे. महापालिका आर्थिक संकटात असताना सुशोभीकरणावर इतका खर्च का? असा सवाल नागरिक विचारीत आहेत.
मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान पुलाचे सुशोभीकरण करण्यात आली आहे. पुलावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २१ कोटी ८७ लाख रुपये खर्च झाले आहेत.
पुलाचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी लोखंडी कमान उभारून रोषणाई करण्यात आली. याचे उद्घाटन आणि पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते नुकतेच झाले. मात्र, पुलाच्या कामाचा खर्च सुमारे ३२ कोटी रुपये आणि सौंदर्यीकरणाचा खर्च सुमारे २१ कोटी ८७ लाख रुपये झाला आहे. त्यामुळे सुशोभीकरणावर इतका खर्च करण्याची गरज होती का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकेने केलेल्या मुळा नदीवरील पुलामुळे जुनी व नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपोडी, खडकी रेंजहिल्स, भोसलेनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढली.
पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे. त्यांना आधुनिक रूप देणे हे महापालिकेचे धोरण आहे. ‘सरकार शितोळे सेतू’च्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यवृद्धीलाही चालना मिळाली आहे. अशा उपक्रमांमुळे सकारात्मक बदल घडून येत असून भविष्यातही अशा प्रकल्पांवर भर दिला जाईल.
शहरातील विद्यमान पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण व देखभाल यावर महापालिका विशेष भर देत आहे. पुलावरील सुशोभीकरण आणि रोषणाईमुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.
भूमिपूजन : ५ जानेवारी २०२२ : हस्ते आमदार (दिवंगत) लक्ष्मण जगताप
उद्घाटन : १४ ऑक्टोबर २०२४ : हस्ते उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार
सौंदर्यीकरण उद्घाटन : ७ एप्रिल २०२६ : हस्ते महापौर रवी लांडगे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.