Pimpri-Chinchwad Police Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘है तयार हम' ; जमावबंदी अन् दारूबंदीही!

Loksabha Election Result 2024 and Pimpri-Chinchwad Police : मिरवणूक काढून जल्लोष करता येणार नसल्याने विजयी उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांचा उद्या होणार हिरमोड

उत्तम कुटे 

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.मावळ (जि.पुणे) मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात होणार असून त्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सहा डीसीपी,दहा सीपी, १७० पीआय, एपीआय़,पीएसआयसह साडेसतराशे पोलिसांचा कडक बंदोबस्त मतमोजणी केंद्रासह पिंपरी-चिंचवडमध्ये ठेवण्यात आला आहे.

मतमोजणीच्या ठिकाणासह पिंपरी-चिंचवड आय़ुक्तालयात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.त्यामुळे विजयी उमेदवाराला मिरवणूक काढता येणार नाही.त्यामुळे त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार आहे.तसेच मतदानाच्या दिवसाप्रमाणे मतमोजणीच्या दिवशीही मद्यविक्री बंद राहणार आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईल,टॅब,लॅपटॉप,कॉर्डलेस फोन आणि इलेक्ट्रॉनिक घड्याळ नेण्यास पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.दरम्यान,पोलिस आय़ुक्त विनयकुमार चौबे यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मतमोजणी केंद्रांची पाहणी करून तेथील बंदोबस्ताचा आढावा घेतला.

मावळसाठी मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारूण यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.३)मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण मतमोजणी केंद्रातच झाले.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ते दिले. मतमोजणी अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आपापसांत समन्वय ठेऊन सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केली.

उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.त्यात प्रथम टपाली मते मोजली जातील.त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. त्यासाठी मतदारसंघनिहाय स्वतंत्र व्यवस्था व टेबले लावण्यात आली आहेत.

फेरीनिहाय निकाल तेथे ध्वनीक्षेपकावरून सांगितला जाणार आहे.तर नागरिकांना त्याची माहिती १९५० या टोल फ्री नंबरवर दिली जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT