Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुनेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा फरार झाला आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत पोलीस तपास करत आहेत. तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून शवविच्छेदन अहवालातून देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या हत्याबाबतचे सर्व गुढ उलगडून सांगितले आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या प्रकरणाबाबत माध्यमांना माहिती देण्यात आली आहे
सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे म्हणाले, "या प्रकरणाच्या तपास पोलिसांकडून अत्यंत योग्य प्रकार सुरू आहे.आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. ना कोणाचा या प्रकरणात आम्हाला फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून तपास देखील वेगाने सुरू आहे,"
फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहे आणि पोलिसांना त्यांना पकडण्यात लवकरच यश येईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे देखील कुऱ्हाडे यांनी सांगितले. अटक असलेल्या आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याचा देखील कुऱ्हाडे म्हणाले.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आलं आहे. याबाबत माहिती देताना कुऱ्हाडे म्हणाले, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत. ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत आणखी माहिती समोर येणार आहे.
सध्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. शरीरावर मारहाणीच्या खुणा देखील असल्याचे त्यांनी सांगितले. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना 21 तारखेपर्यंत पोलिस रिमांड आहे.
या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे त्यानुसार जे पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहे, त्यामुळे या घटनेचा लेखाजोखासमोर आला आहे. वैष्णवी हगवणे यांना मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे उद्या आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलिस रिमांड वाढवून घेणार आहोत.
हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आणखी काही पुरावे मिळतात का, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचा देखील कुऱ्हाडे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.