Vijay Wadettiwar: रेल्वे तिकिटांवर ऑपरेशन सिंदूर, मोदींचा फोटो कशासाठी? वडेट्टीवारांचा भाजपला सवाल

PM Modi’s Photo on Railway Tickets Controversy:राहुल गांधीने प्रश्न विचारले तर सैन्याचा अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. पुलवामात अडीचशे किलो आरडीएस कुठून आले, कोणी आणले, आणणारे कोण होते याचा शोध अद्यापही घेतला जात नाही.
PM Modi’s Photo on Railway Tickets Controversy
PM Modi’s Photo on Railway Tickets ControversySarkarnama
Published on
Updated on

Nagpur: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध विराम झाला आहे. त्यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दीकयुद्ध सुरू झाले आहे. दोन्ही पक्षाच्यावतीने यात्रा काढल्या जात आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका टिपणी करीत आहेत.

काँग्रेसच्या तिरंगा यात्रेवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना रेल्वेच्या तिकीटांवरील ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावरून राजकारण कोण करते हे सांगण्याची गरज नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

सैनिकांच्या सन्मानार्थ आणि राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस सद्भावना दिवस जाहीर करण्यात आला. हे निमित्त साधून काँग्रेसच्यावतीने आज तिरंगा यात्रा काढली जात आहे. सर्व धर्मांना समान अधिकार आणि वागणूक मिळावी आणि समाजात सद्भावना निर्माण व्हावी यासाठी काँग्रेसची यात्रा आहे असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

PM Modi’s Photo on Railway Tickets Controversy
Aamir Hamza: हाफिज सईदचा राइट हँड दहशतवाद्यांचा आका भोगतोय मरणयातना! कोण आहे आमिर हमजा

यापूर्वीसुद्धा भारताने युद्ध जिंकले आहे. १९६२, १९६५ आणि १९७१च्या युद्धात भारताने मोठा विजय मिळवला होता. चीनच्या युद्धावरून जवाहरलाल नेहरू यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावून लोकांना उत्तरे देण्यात आली होती. मात्र मोदींच्या काळात उत्तरे दिली जात नाही.

PM Modi’s Photo on Railway Tickets Controversy
Mahayuti Local Body Elections : महायुती झाल्यास इच्छुकांवर अन्यायाची शक्यता

या देशात लोकशाही आहे जनतेला आणि विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधीने प्रश्न विचारले तर सैन्याचा अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. पुलवामात अडीचशे किलो आरडीएस कुठून आले, कोणी आणले, आणणारे कोण होते याचा शोध अद्यापही घेतला जात नाही याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.

पहलगाममध्ये चार अतिरेक्यांचे स्केच दाखवल्या गेले. ते कुठे लपले आहेत, सीमेपार लढाई केली, मात्र भारतात लपलेल्या अतिरेकी का हातात लागत नाही, त्यांचा शोध का घेतला जात नाही, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला. आम्ही याची विचारणा केली सैनिकांचा अपमान करता तुम्ही देशद्रोही असे आरोप केले जातात. देशाचा अपमान करणारे कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com