पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट होताच प्रमुख राजकीय पक्ष लगेच तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देणार असल्याचे आम आदमी पक्ष तथा `आप`ने (AAP) आज (ता. २१ मे) जाहीर केले. तर, या मिशन २०२२ साठी बूथ यंत्रणेवर विशेष भर देत भाजपने (BJP) शंभर प्लसचा नारा आज पुन्हा एकदा दिला. (Pimpri Corporation election is a matter of prestige for BJP : Chandrakant Patil)
आगामी पिंपरी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी केली असून, प्रदेश नेतृत्त्वाने त्यात लक्ष घातले आहे. त्यांनी बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला असून, 'यंदाचा निर्धार १०० पार', असा संकल्प केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची शनिवारी (ता. २१ जून) आढावा बैठक झाली.
आगामी निवडणूक ही पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे; म्हणून शहर कार्यकारिणीने बूथ यंत्रणा मजबूत करावी. केंद्र सरकार व राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारच्या कामांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोचवावी, असा आदेश पाटील यांनी दिला. या निवडणुकीत इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांना घराघरांत पोचवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीबाबत येत्या ५ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून तीत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपमध्ये काही बदल होणार का वा काहींना नवी खास जबाबदारी दिली जाणार का, अशी चर्चा लगेच सुरु झाली आहे.
भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे आदी आजच्या बैठकीला उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.