Kishor Aware Brulte Kill News : Satish Shetty
Kishor Aware Brulte Kill News : Satish Shetty Sarkarnama
पुणे

Pimpri News : किशोर आवारेंच्या हत्येने आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येच्या आठवणी झाल्या जाग्या !

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची चार हल्लेखोरांनी आज भरदिवसा नगरपरिषद कार्यालयासमोरच गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. त्यांच्या हत्येने तळेगावातच १३ जानेवारी २०१० ला झालेल्या सतीश शेट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

शेट्टी आणि आवारेंच्या हत्येत आणखी एक साम्य आहे. दोघांचाही तीक्ष्ण हत्याराने तळेगावातच ती निर्घूणपणे करण्यात आली आहे. आयआरबी कंपनीच्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाका बंद करण्यासाठी आवारेंनी मोठे आंदोलन नुकतेच केले होते. तर, शेट्टी यांनीही आयआरबी कंपनीने जमिनी लाटल्याची तक्रार केली होती. त्यांच्या खूनातही ही कंपनी तिच्या मालकाला आरोपी करण्यात आले होते. आवारेंचीही हत्या जमिनीच्या प्रकरणातूनच झाल्याचा संशय आहे.

जीवाला धोका असल्याची जाणीव आवारे यांनाही होती. त्याबाबत त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना काळजी घेण्यासही सांगितले होते. पण, त्याकडे त्यांनी दूर्लक्ष केले. गाफील राहिले अन आज ते जीवालाच मुकले. पोलिस संरक्षण नाही, तर खासगी सुरक्षाही न घेता ते बिनधास्त वावरत होते. सामाजिक काम करीत असल्याने आपल्याला कोण काय करील, अशी त्यांची काहीशी भावना होती. पण, पार्श्वभूमी विचारात घेता त्यांनी संरक्षण घ्यायला हवे होते वा किमान काळजी तरी घ्यायला हवी होती, अशी भावना आता त्यांचे चाहते व्यक्त करीत आहेत.

आवारेंच्या हत्येचा स्थानिक पातळीवरील राजकारणात परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप हा इश्शू करण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांना फायदा होईल, असा एक मतप्रवाह आहे. तर राष्ट्रवादीच्या मते आवारे म्हणजे त्यांची समिती घेत असल्याने आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थानिक निवडणुकीत फायदा होईल, असा दुसरा मतप्रवाह आहे.

दरम्यान, आवारेंच्या मारेकऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेज आणि धमकी देऊन पळून जाण्य़ासाठी त्यांनी वापरलेल्या दोन बाईकही पोलिसांना मिळाले आहे. मारेकऱ्यांना पकडण्य़ासाठी त्यांची चार पथके रवाना झाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT