Pimpri Crime News : मावळ पुन्हा हादरले, तळेगाव नगरपरिषद कार्यालयासमोर भरदिवसा आवारेंची निर्घृण हत्या

Maval Taluka News : मावळात दीड महिन्यात दुसरी हत्या..
Kishaor Gangaram Aware
Kishaor Gangaram AwareSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Crime News : मावळ तालुका दीड महिन्याच्या कालावधीत आज पुन्हा एकदा हादरला. तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर आज भरदुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware Killed) (वय ५०) यांची चार हल्लेखोरांनी निर्घूण हत्या केली. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय आहे. (Pune Crime News)

यावर्षी १ एप्रिलला मावळातच प्रति शिर्डी शिरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही आवारेंसारखीच निर्घूण हत्या झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तीन मारेकऱ्यांनी डोक्यात कोयत्याचे घाव घालून साई मंदिरासमोरच गोपाळेंचा खून केला होता. खून करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी घटनास्थळाची रेकी केली होती. पाळत ठेवून त्यांनी हल्ला केला होता. तसेच आवारेंवरही पाळत ठेवून दबा धरून त्यांना मारण्यात आले.

Kishaor Gangaram Aware
Sarpanch Shirgaon Murdered : धक्कादायक ! प्रतिशिर्डी शिरगावच्या सरपंचाचे सपासप वार करून निर्घृण खून; परिसरातून हळहळ व्यक्त..

नगपरिषद कार्यालयात ते कामानिमित्त दुपारी आले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटून ते दीडच्या सुमारास बाहेर पडताच प्रवेशव्दारासमोर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी डाव साधला. आवारेंवर प्रथम त्यांनी गोळ्या झाडल्या. नंतर कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर लगेच पळून गेले नाहीत. ते काही वेळ तिथेच थांबले होते.

शवविच्छेदनासाठी आवारेंचा मृतदेह पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, व्यावसायिकांनी आपली दुकाने आणि व्यवहार बंद केले आहेत. तणावग्रस्त परिस्थिती पाहता या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Kishaor Gangaram Aware
NCP Sarpanch Murdered : NCP सरपंच प्रवीण गोपाळे खूनप्रकरणी मोठी अपडेट ; चार संशयित ताब्यात.

सोमाटणे फाटा येथील आयआरबीचा टोलनाका बंद करण्याच्या आंदोलनातून ते अधिक प्रकाशझोतात आले. अॅट्रोसिटीचा गुन्हा झाल्यावरही त्यांची चर्चा झाली होती. सध्या प्रशासकीय कारभार सुरु असलेल्या तळेगाव नगरपरिषदेच्या सहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत जनसेवा विकास समिती स्थापन करून सात-आठ नगरसेवक निवडून आणले होते. नंतर भाजपशी युती करून नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली होती. जमिन खरेदी विक्रीतून वा राजकीय वादातून त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच सुपारी देऊन त्यांना मारण्यात आल्याचे समजते. (Pimpri Chinchwad News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com