Pimpri Chinchwad News Pcmc Sarkarnama
पुणे

Pimpri News : पालिकेची भन्नाट ऑफर; 30 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा, 20 टक्के सवलत मिळवा!

Pimpri Chinchwad News : आयुक्त शेखरसिंह यांचा पुढाकार...

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad Corporation News : पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने २०२३ -२४ या वर्षातील मालमत्तावरील सामान्य करामधील सवलत व सूट जाहीर केल्या आहेत. महिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीच्या करांवर ३० टक्के, दिव्यांगाच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर ५० टक्के, तर माजी सैनिकांच्या नावावर असलेल्या १०० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. मागील वर्षी याचा लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग, आणि माजी सैनिकांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, ३० जूनपर्यंत कर भरून सवलीतीचा लाभ घेता येईल.

पिंपरी चिंचवडच (Pimpri Chinchwad News) शहरात एकूण ५ लाख ९७ हजार ७८५ मालमत्तांची नोंद आहे. यातून गतवर्षी ८१७ कोटी रूपयांचा महसूल जमा करण्यात आले होते. आता या अनुषंगाने २०२३ या वर्षात एक हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा विचार विभागाकडून केला गेला आहे. यासाठी सगळ्या सेवा-सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केले गेले आहेत. तसेच, पर्यावरण पूरक हौसिंग सोसायटी धारकांनी या सवलतींचा फायदा करून घेण्यासाठी लवकरात-लवकर अर्ज सादर करावेत, यामुळे त्यांना आगाऊ कर आणि पर्यावरण पूरक सवलती सुविधांचा एकत्रितपणे लाभ घेता येईल .

आगाऊ मालमत्ता करधारक कर भरण्यामुळे सामान्य करांमध्ये पाच टक्के, महिलांच्य नावे असलेल्या निवासी घरास ३० टक्के, तसेच ज्यांचे दिव्यांगत्व ४० टक्के वा जास्त आहे अशा अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर यांच्या नावे असणाऱ्या मालमत्तेस ५० ट्कके, स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्यसैनिक यांची पत्नी एक निवासी घर ५० टक्के, ऑनलाईन पेमेंट गेट वे, आरटीजीएस,नेफ्टद्वारे मालमत्ता करणाऱ्या करधारकांना ३० जूनच्या अवधीपर्यंत पाच टक्के सूट देण्यात येईल, तर जुलै अखेरपर्यंत कर भरणा करणाऱ्या नागरिकांना सवलत मिळणार आहे.

याबाबत आयुक्त शेखरसिंह म्हणाले, "मालमत्ताधारक नागरिकांनी ३० जूनपर्यंत संपूर्ण कर भरल्यास, किमान १० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा नागरिकांनी फायदा करून घेतला पाहिजे. यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क भुर्दंड पडू नये, यासाठी ३० जूनपूर्वी नागरिकांना कर भरणा करावी. "

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT