Ajit Pawar News : पंतप्रधान असो वा कुणीही....कोणाच्याही डोळ्यांदेखत, कुठेही अजित पवार कधी कोणाला चिमटा काढतील, सल्ला देतील, कोणावर ओरडतील याचा खरोखरीच नेम नसतो. "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळालेले घर कृपा करून विकू नका," अशा शब्दांत अजित दादांनी मोदींपुढे दमच भरला.
पुणे शहरात उभारलेल्या घरांचे वाटप पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात अजितदादांनी सुरवातीला भाषण केले. तेव्हाच घरांचा मुद्दा मांडून ते विकण्याचा सल्ला त्यांनी लाभार्थ्यांना दिला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर पाहुणे उपस्थित होते.
अजितदादा म्हणाले, ‘‘देशात मोदी हे विकासाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या झपाट्यामुळे मेट्रो आणि अन्य सुविधा विस्तारत आहेत. यापुढच्या काळात योजनांची व्याप्ती वाढविण्याच्या नियोजन आहे. त्यात कोणत्याही स्वरुपाच्या अडचणी न आणता विकासाचा रथ पुढे नेऊ.’’
अजित पवार लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमानंतर पंतप्रधान शिवाजीनगरमधील पोलीस ग्राउंडवर होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. राष्ट्रवादीतील बंड, नवे सरकार आणि अजिदादा गटाचा पक्षावरचा दावा या घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र आले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेने टोकाचा विरोध केल्याने हा दौरा चर्चेत आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते मोदींसोबत स्टेजवर बसल्याने असल्याने विरोधकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यावरून शिवसेनेने उघडपणे नाराजी मांडली आणि पवारांना सल्लेही दिले. महाविकास आघाडीतील मतभेदांपेक्षा या शरद पवार आणि अजित पवार हे मोदींसोबत एकत्र होते. केवळ विरोधकांचा मोदींच्या दौऱ्याला विरोध म्हणून या कार्यक्रमाकडे जेवढे लक्ष आहे, तेवढेच दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याकडेही राजकीय वर्तुळाच्या नजरा राहणार आहेत.
विशेष म्हणजे मोदी, शिंदे, पवार, फडणवीसांसह व्यासपिठावर राहणार आहे. अशात दोन्ही पवार समोरासमोर आले. याआधी शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजितदादा आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांनी दोनदा पवारसाहेबांची भेट घेतली होती. मात्र, हे दोघेही कोणत्याही कार्यक्रमांत एकत्र आले नव्हते.त्याला मोदी दौऱ्याचे दौऱ्याचे निमित्त ठरले असून, लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकास ठिकाणी दिसले.