Narendra Modi Pune Visit : 'इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या...; पुण्यात येण्याआधीच मोदींचे ट्विट चर्चेत

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या तासा-दिड तासात पुण्यात येणार आहेत, त्यांच्या स्वागतापासून सुरक्षेपर्यंत मोठी तयारी झाली आहे. पंतप्रधान मोदी पहिल्यांदा दगडूशेठ गणपतीची आरती करतील, सर परशुराम महाविद्यालयातील पुरस्काराच्या कार्यक्रमाला हजर असतील, हा पुरस्कार घेण्याआधीच दिल्ल्लीतून ट्विट करत, लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. मी आज पुण्यात असेन, जिथे मी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहे. आपल्या इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याशी जवळचा संबंध असलेला हा पुरस्कार मला प्रदान करण्यात येणार आहे, याबद्दल मी खरोखरीच आभारी आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

PM Narendra Modi
Lomanya Tilak Award : पंतप्रधान मोदींना जाहीर झालेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा असा आहे इतिहास

आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाप्पाची आरती करतील. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12:45 वाजता मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याचवेळी विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ देखील करणार आहेत. तसेच, मोदींच्या हस्ते शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचेही लोकार्पण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 'वेस्ट टू एनर्जी' संयंत्राचे उद्‌घाटनही त्यांच्याच हस्ते होणार आहे.

असा आहे पंतप्रधान मोदींचा दौरा

सकाळी १०.१५ लोहगाव विमानतळावर आगमन

सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील 'हेलिपॅड'वर येतील.

सकाळी १०.५५ मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती.

सकाळी ११ ते ११.३० ला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात ते पुजा

सकाळी ११.४५ वाजता मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान

दुपारी १२.४५ वाजता विविध विकासकामांचे मोदींच्या हस्ते उदघाटन आणि भूमिपूजन होईल.

दुपारी १.४५ ते २.१५ हा वेळ कार्यक्रमांसाठी राखीव

दुपारी २.२५ कृषि महाविद्यालयाच्या मैदानवरील 'हेलिपॅड'वर येतील.

दुपारी २.५५ वाजता मोदी दिल्लीकडे प्रस्थान

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com