Pune-Mumbai highway Accident news update Sarkarnama
पुणे

Pune-Mumbai highway Accident: बोरघाटातील अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून मोठी मदत जाहीर...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सरकारनामा ब्युरो

Pune-Mumbai highway Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खासगी बस (Private bus) दरीत कोसळली. बसमध्ये 40 ते 45 प्रवाशी होते. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली असून अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (PM announces huge help to Borghat accident victims)

याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्वीट करत घटनेबद्दल दु:खही व्यक्त केला आहे. 'रायगडमध्ये झालेल्या बस अपघातात प्रवाशांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, रायगडमधील बस दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या एका खासगी बसचा खोपोलीमध्ये अपघात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही खासगी बस बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील आहे. पुण्यातील कार्यक्रम संपवून बस गोरेगावला जात असताना रस्त्यात हा अपघात झाला. बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. (Accident)

खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT