Old Pune-Mumbai highway Accident News : शनिवारची सकाळ उजळली ती एका भीषण अपघाताच्या बातमीने, बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 जण जखमी झाले आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खासगी बस (Private bus) दरीत कोसळली. बसमध्ये 40 ते 45 प्रवाशी होते.
यामधील १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 20 ते ३० प्रवाशी जखमी झाल्याचे समजते. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुण्याहून रात्री ही मुंबईकडे रवाना झाली होती. अद्यापर्यंत २५ जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.
ही खासगी बस बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील आहे. पुण्यातील कार्यक्रम संपवून बस गोरेगावला जात असताना रस्त्यात हा अपघात झाला. बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळली आहे.
खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. आणखी काही प्रवासी बसमध्ये अडकल्याचे पोलिसांने सांगितले. त्यांना बचाव पथकांकडून बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.