Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad  Sarkarnama
पुणे

Narendra Modi : पिंपरी-चिंचवडकरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांशी ‘मन की बात’ होते. प्रत्येक रज्यातील एखादे शहर या 'लाईव्ह शो'त सहभागी होत असते. काल (ता.२५) त्यात पिंपरी-चिंचवडचा नंबर लागला. यावेळी त्यांनी येत्या तीन वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प बोलून दाखवला.

'मन की बात'व्दारे उद्योगनगरीतील विविध क्षेत्रातील नागरिकांशी मोदींनी संवाद साधला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी उपमहापौर नानी घुले, माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापती नितीन लांडगे, पक्षाचे चिंचवड विधानसभा प्रमुख शंकर जगताप, भाजपचे प्रदेश सचिव आणि 'मन की बात'चे पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) संयोजक नंदकुमार दाभाडे तसेच संदिप कस्पटे आदी उपस्थित होते.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे देशाला असामान्य नेतृत्व देणारे महान राजकीय नेते होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण आणि परराष्ट्र धोरण, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेले. या शब्दांत आजी पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान अटलजींचे कौतूक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपचे शहर सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी, तर प्रास्ताविक गोरखे यांनी केले. दाभाडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT