Uddhav Thackeray-narendra modi-ajit pawar Sarkarnama
पुणे

PM मोदींचा पुणे दौरा : अजितदादांचं तर ठरलं, ठाकरेंच अद्याप फिक्स नाही

PM Narendra Modi | Uddhav Thackeray | Ajit Pawar | Pune Visit : अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश असणार आहे.

मात्र सध्या मंत्री नवाब मलिक यांची अटक, भाजपकडून महाविकास आघाडीवर करण्यात येणारे विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप किंवा या सर्वांला महाविकास आघाडीकडून देण्यात येणारी प्रत्यूत्तर यामुळे सध्याची चिघळलेली राजकीय परिस्थिती पाहता भाजप आणि महाविकास आघाडीचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला महाविकास आघाडीतील आणि महाराष्ट्र सरकारमधील कोण-कोण उपस्थित राहणार याबाबत सवाल विचारले जात होते.

मात्र आता या दौऱ्याला आपण उपस्थित राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते पुण्यात जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे. प्रोटोकॉलचा भाग म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी उपस्थित असणारच आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या तब्येतीमुळे तेच निर्णय घेतील. मी त्यांच सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT