भाजपचा निवडणूक धमाका : महापालिकेकडून पुणेकरांना २ हजार ५०० कोटींचे गिफ्ट

Pune | Municipal Corporation | Election | : ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर
Murlidhar Mohol - Narendra Modi
Murlidhar Mohol - Narendra Modi Sarkarnama

पुणे : महापालिकेची मुदत येत्या १४ मार्चला संपत असून त्यापूर्वी सत्ताधारी भाजपकडून पुणेकरांना (Pune) मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यात येणार आहेत. त्यांच्या हस्ते भाजपकडून (BJP) निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा मानस आहे. याचीच प्रशासकीय तयारी म्हणून स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल २ हजार ५०० कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुणेकरांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.

मंजुरी देण्यात २ हजार ५०० कोटींच्या कामांमध्ये मैलापाणी व्यवस्थापनाचा १४७३ कोटींचा नदीसुधार प्रकल्प (जायका), नदीकाठ सुधार प्रकल्पातील संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा हा ८६९ कोटी प्रकल्प, १४० कोटींचे ८ पीपीपीतील रस्ते व उड्डाणपूल अशा कामांचा समावेश आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृहनेते गणेश बीडकर उपस्थित होते.

Murlidhar Mohol - Narendra Modi
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस देणार ‘मोदी गो बॅक’चा नारा

काल दुपारी १ वाजता स्थायी समितीची बैठक सुरू होणार होती, पण यापूर्वी महापालिकेतील पदाधिकारी, स्थायी समितीचे सदस्यांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये खलबते सुरू होते. त्यामुळे ही बैठक प्रत्यक्षात ४ वाजता सुरू झाली. तसेच ४ मार्च रोजी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले जाणार असल्याने आजची बैठकही विद्यमान अध्यक्ष रासने यांची अखेरची बैठक ठरली. त्यामुळे महत्त्वाचे सर्व विषय आजच्या बैठकीत मंजूर करून घेण्यासाठी गडबड सुरू असल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले.

तब्बल १०८ कोटींचे रस्ते

खराडी भागातील आठ डी. पी. रस्ते डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी १०८ कोटी १६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागामालकांची रोख मोबदल्याची मागणी अशा कारणांमुळे खासगी सहभागातून हे रस्ते विकसित केले जातील. एफएसआय किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या वर्षी एकूण ११ रस्ते आणि दोन पुलांची कामे पीपीपीमध्ये करण्यात येत आहेत. खराडी मुळा-मुठा नदीवर २४ मीटर लांबीचा पूल पीपीपी तत्त्वावर बांधला जाणार आहे. त्याच्या सुमारे ३२ कोटींच्या खर्चाला स्थायीने मान्यता दिली.

Murlidhar Mohol - Narendra Modi
ना बापट ना बीडकर...पांडेंकडे दिली भाजपाने निवडणुकीची सूत्रे

६ मार्च रोजी पंतप्रधान मोदी पुण्यात

६ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com