Pune PMC action against illegal coaching classes Sarkarnama
पुणे

PMC Action on Motegaonkar: मोटेगावकरला दणका! पुण्यातील क्लासेस बंद; डेक्कनच्या इमारतीला महापालिकेनं ठोकलं टाळं

PMC seals Motegaonkar classes in Pune: NEET पेपरफुटीप्रकरणात नाव आल्यानं RCC क्लासेसचा सर्वोसर्वा प्रा. शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. मोटेगावकरसह इतर अनेकांची यात नाव आल्यानं पेपरफुटीप्रकरणात मोठं कट-कारस्थान रचल्याचं आता उघड झालं आहे.

Amit Ujagare

Shivraj Motegaonkar RCC classes controversy: NEET पेपरफुटीप्रकरणात नाव आल्यानं RCC क्लासेसचा सर्वोसर्वा प्रा. शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. मोटेगावकरसह इतर अनेकांची यात नाव आल्यानं पेपरफुटीप्रकरणात मोठं कट-कारस्थान रचल्याचं आता उघड झालं आहे.

मोटेगावकरच्या अटकेनंतर गेल्या तीन दिवसांपासून तपास यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर फी आकारुन विद्यार्थ्यांची अशा प्रकारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता पुणे महापालिकेनं देखील महत्वाची पावलं उचलली असून डेक्कन भागातील मोटेगावकर क्लासेसला सील करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकी कारवाई काय?

डेक्कन भागात मोटेगावरच्या आरसीसी क्लासेसची शाखा आहे. एका खासगी इमारतीत भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत हे क्लासेस सुरु आहेत. हे क्लासेस ज्या दोन मजल्यांवरील वर्गखोल्यांमध्ये चालतात ते दोन मजले महापालिकेनं सील केले आहेत. ही कारवाई करण्यामागे कारण म्हणजे संबंधीत इमारत उभारतानाच नियमांचं उल्लंघन झाल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नसल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. ही दोन महत्वाची कागदपत्रे नसतानाही ही इमारत उभी राहिली आणि तिचा व्यावसायिक कामासाठी वापर देखील केला जात आहे. याद्वारे इमारतीचं बांधकाम करणाऱ्यानं महापालिकेचा मोठा कर बुडवल्याचं स्पष्ट होत आहे.

डेक्कन भागातील या क्लासेसमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची फसवणूक रोखण्यासाठीच प्रामुख्यानं महापालिकेनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. पण यासाठी तांत्रिक कारणं सांगून महापालिकेनं हा क्लास बंद केला आहे. त्यामुळं याप्रकरणी एकतर इमारतीच्या मालकाला संबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच हे टाळं काढलं जाईल अन्यथा आरसीसी क्लासेसला इतर जागेमध्ये क्लास सुरु करावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT