Farmer Subsidy Scheme : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 'पर ड्रॉप मोर क्रॉप' योजनेअंतर्गत सिंचन साहित्यावर मिळतीये 70 ते 75 टक्के सबसिडी; जाणून घ्या काय आहे योजना

Irrigation subsidy scheme for small farmers : पर ड्रॉप मोर क्रॉप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन साहित्यावर 70 ते 75 टक्के अनुदान मिळत आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Per Drop More Crop scheme subsidy for farmers
Per Drop More Crop scheme subsidy for farmersSarkarnama
Published on
Updated on

PMKSY Per Drop More Crop benefits for farmers: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची 'पर ड्रॉप मोर क्रॉप' योजना मोठा दिलासा ठरत आहे. शेतीसाठी पाण्याची वाढती कमतरता आणि पारंपरिक सिंचन पध्दतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय लक्षात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाता वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रिप सिंचन आणि स्प्रिंकलर प्रणाली बसवण्यासाठी सरकारकडून 70 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 25 ते 30 टक्के खर्च स्वतः करावा लागतो. उर्वरित रक्कम सरकारकडून दिली जाते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांनाही आधुनिक सिंचन सुविधा सहज उपलब्ध होत आहेत.

Per Drop More Crop scheme subsidy for farmers
Railway Recruitment 2026 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका! रेल्वेने काढली 11,127 पदांची बंपर भरती; असा करा अर्ज

ड्रिप आणि स्प्रिंकलर सिंचनामुळे पाण्याचा वापर नियंत्रित पद्धतीने होतो. पाणी थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचत असल्याने पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनातही वाढ दिसून येते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या तंत्रज्ञानामुळे जवळपास 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होत असल्याचे सांगितले जाते. तसेच पिकांच्या उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असते.

याशिवाय खत व्यवस्थापन, मजुरी खर्च आणि विजेचा वापर कमी होण्यासही मदत मिळते. त्यामुळे शेतीचा एकूण खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढण्यास हातभार लागतो. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर मानली जात आहे.

Per Drop More Crop scheme subsidy for farmers
Jayant Patil vs Gopichand Padalkar clash : जयंत पाटील-गोपीचंद पडळकरांचे समर्थक आमनेसामने; विट्यात मध्यरात्री तुफान राडा, गाड्या आणि घर फोडलं!

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी संबंधित कृषी विभाग किंवा अधिकृत पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com