Pune Budget  Sarkarnama
पुणे

PMC Budget 2024 : भाजपचे लोकसभा इलेक्शन बजेट आयुक्तांच्या पोतडीतून...

PMC Budget 2024 : पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आज 2024-25 चे रुपयांचे बजेट मांडले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बजेट मांडले

Sudesh Mitkar

PMC Commissioner Vikram Kumar : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बजेट मांडले आहे. या बजेटच्या माध्यमातून भाजपने सुरू केलेले अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आणि भाजपने (BJP) घोषणा केलेल्या योजना पुढे नेण्याचा चंग महापालिका आयुक्तांनी बांधला असल्याचं बोललं जात आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी आज 2024-25 चे 11601 कोटी रुपयांचे बजेट मांडले आहे. यामध्ये कोणतीही कर वाढ सुचवण्यात अली नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अडथळ्यात पालिकेचे बजेट अडकू नये, यासाठी पालिका आयुक्त यांनी अगदी आचारसंहिता लागण्यास काही दिवस असताना बजेट मांडले आहे. गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2 हजार 086 कोटींनी जास्त आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदाही मार्चमध्ये बजेट

महापालिकेच्या सभासदांची मुदत संपुष्टात आल्यानंतर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून मांडले जाणारे हे दुसरे बजेट असणार आहे. पालिका आयुक्त प्रशासक म्हणून हे बजेट मांडतील. 2023-24च्या जानेवारीमध्ये झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच पुण्यात आयोजित करण्यात आलेली जी 20 परिषद यामुळे पालिका आयुक्तांचे बजेट लांबले होते. दरवर्षी जानेवारीमध्ये मांडले जाणारे हे बजेट दोन महिने पुढे जाऊन मार्च 2023 मध्ये मांडले गेले होते. यंदादेखील हे बजेट मार्चमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी मांडण्यात येत आहे. Pune Municipal Corporation Budget 2024

तीन वर्षांनंतर ही बदली नाही

महापालिकेचे 2023-24चे बजेट सादर करताना मागील वर्षीच्या 2022-23 च्या बजेटमध्ये तब्बल एक हजार कोटी रुपयांची वाढ करत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी साडेनऊ हजार कोटी रुपयांचे बजेट मांडले होते. प्रशासक म्हणून सध्या तेच या बजेटची अंमलबजावणी करत आहेत. पालिका आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विक्रम कुमार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या मंडळींशी जुळवून घेणे पसंत केल्याने तीन वर्षांनंतरही ते आपल्या कामाच्या तत्परतेमुळे या पदावर टिकून आहेत. PMC Budget 2024 News in Marathi

गेल्या वर्षी राजकीय घडामोडी घडून राज्यात एकनाथ शिंदे (Eknath shinde) , देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. नव्या सरकारसोबत त्यांनी उत्तमरीत्या जुळवून घेतले. त्यानंतर अजित पवार हे सरकारमध्ये आल्या नंतरदेखील जुळवून घेतल्यामुळे अद्यापही त्यांची बदली झाली नसल्याचे बोले जात आहे. दरम्यान, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत पुन्हा आयुक्तांच्या बदलीची चर्चा होती. परंतु पुन्हा एकदा त्यांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीतच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पालिका आयुक्तांच्या कामावर विश्वास दाखविला आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता आयुक्तांकडून नागरिकांच्या फायद्यासाठीच्या योजनांची घोषणा करून त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पालिका आयुक्तांचे हे बजेट लोकसभा निवडणुकीत Loksabha Election महत्त्वाची भूमिका बजाविणार असल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. Pune PMC Budget 2024 Key Points

खर्चाचा आराखडा

  • सेवकवर्ग खर्च - 3556.90 कोटी

  • भांडवली व विकासाची कामे - 5093.22 कोटी

  • देखभाल दुरुस्ती व इतर खर्च - 1861.82 कोटी

  • वीज खर्च व दुरुस्ती - 385.80 कोटी

  • पाणी खर्च - 150 कोटी

  • औषधे, पेट्रोल /डिझेल - 226.60 कोटी

उत्पन्न बाजू

  • प्रॉपर्टी टॅक्स 2549.79 कोटी रुपये

  • GST - 2502 कोटी

  • विकास शुल्क - 2492.83 कोटी

  • शासकीय अनुदान - 1762.17 कोटी

  • कर्ज/कर्जरोखे - 450 कोटी

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT