Supriya Sule News : 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही...' ; खासदार सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या...

Supriya Sule On NCP Crisis : आमचे जेथे उमेदवार आहे तेथे उद्धव ठाकरे हे मदत करणार आहेत.
Supriya Sule News
Supriya Sule NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही तर तो चोरून नेला आहे. याबाबत कोर्टात खटला चालू असून पक्ष फुटला नाही, यावर आपण ठाम असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Supriya Sule News
NCP Politics : 'या' 15 जागांचा राष्ट्रवादीने घेतला आढावा, दावा पण करणार का ?

बारामती लोकसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीपूर्वी खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य करत आपली भूमिका मांडली.

शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) हा पक्ष स्थापन केला आहे. तो पक्ष आमचाच आहे तो फुटलेला नाही तर तो चोरलेला आहे अशा शब्दात, खासदार सुळे यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पार्श्वभूमीवर बारामती मध्ये उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे याबाबत सुळे यांना विचारले असतात त्या म्हणाल्या, ‘आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. आमचे जेथे उमेदवार आहे तेथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मदत करणार आहेत. तसेच जेथे काँग्रेस–सेनेचे उमेदवार असतील तेथे आम्ही सुद्धा त्यांना ताकदीने मदत करणार आहोत. आघाडीत जेव्हा आम्ही शब्द दिला, तो आम्ही पाळला आहे.

Supriya Sule News
Bachchu Kadu : लोकसभेत सगळ्या जागा भाजप लढवेल, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा !

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ही 'नॅचरली करप्ट पार्टी', ‘भ्रष्टाचारी’, ‘घोटाळेबाज’ अशी टीका गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जेव्हा महाराष्ट्रात येत होते तेव्हा करायचे. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारातून मुक्ती दिली आहे, याचा मला आनंद आहे.

वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कांद्याला भाव, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यावर गृहमंत्री शाह यांनी बोलले पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com