PMC Budget News sarkarnama
पुणे

PMC Budget News : जी-20 मुळे महापालिकेचा अर्थसंकल्प गेला महिनाभर पुढे

PMC News : अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : यंदा पुणे महापालिकेच्या (pmc) अर्थसंकल्प (budget)सादर होण्यास विलंब लागणार असल्याचे चित्र आहे.

नुकत्याच पुण्यात झालेल्या 'जी २०'मुळे प्रशासनास अर्थसंकल्प करण्यात वेळ न मिळालेला नाही, तसेच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची होत असलेली पोटनिवडणूक, या निवडणुकीमुळे अर्थसंकल्‍प सादर करण्यास विलंब होणार आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयुक्तांकडून अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. पण यंदा महापालिकेवर प्रशासक असल्याने आयुक्त सादर करतील तोच अर्थसंकल्प अंतिम होईल.

‘जी २०’ बैठकीच्या तयारीसाठी गेल्या दीड महिन्यापासून सर्व विभाग प्रमुख व्यस्त होते. आयुक्त विक्रम कुमार यांनाही अर्थसंकल्पाच्या बैठका घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे विलंब होत आहे.

‘जी २०’ परिषद झाल्यानंतर आता अर्थसंकल्पाच्या बैठका सुरू होणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर व्हावा, असे अपेक्षीत होते. मात्र, पोट निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होणार असल्याने २०२३-२४ चा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता आहे.

कसबा पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्याच परिणाम या मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या नव्या कामांना होणार आहे. पण जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू होते.

नियमानुसार १५ जानेवारी रोजी आयुक्तांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणे आवश्‍यक असते. त्यासाठी काही आठवड्यापूर्वीच सर्व विभाग प्रमुखांना पुढील अर्थसंकल्पासाठी तरतुदीचे मागणी पत्र, योजना तयार कराव्यात असे आदेश दिले आहेत.

याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, "पोटनिवडणुकीची आचारसंहिता कसबा मतदारसंघापुरतीच आहे. त्यामुळे इतर भागातील विकास कामे व निविदा यांना अडथळा येणार नाही. तसेच आगामी अर्थसंकल्पाची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT