PMC Election Trend : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह एकूण २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युती आणि आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू असतानाच, इच्छुक उमेदवार मात्र मंदिरं, बाबा-बुवा आणि ज्योतिषांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र दिसत आहेत.
काहींच्या बोटात नव्या रत्नांच्या अंगठ्या चमकताना दिसत आहेत. तर काहींच्या मनगटावर काळे, भगवे किंवा लाल रंगाचे गंडेदोरे बांधलेले आहेत. अर्ज भरण्याचा मुहूर्त, प्रचाराची सुरुवात, सभांचे दिवस आणि अगदी उमेदवारी टिकेल की नाही? यासाठीही अनेकजण ज्योतिषांचा सल्ला घेत आहेत.
कुंडलीतील राजयोग किंवा विजययोग तपासून मंत्रजप, शांती अनुष्ठाने किंवा यज्ञयाग असे उपाय सुचवले जात आहेत. काही इच्छुक तर नोव्हेंबरपासूनच हे उपाय करत असल्याचे समजते. कुलदैवतांच्या दर्शनासाठी गावाकडे धाव घेणारे उमेदवारही कमी नाहीत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत राजकीय रणनीतीबरोबरच अध्यात्म आणि ज्योतिषाची साथ घेण्याची स्पर्धाच सुरू आहे. पुण्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी शिर्डी साईबाबा, तिरुपती बालाजी, महाकालेश्वर उज्जैन यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. काहींनी तर भरलेले उमेदवारी अर्ज देवाच्या चरणी ठेवून राजकीय यशासाठी विशेष प्रार्थना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जनसंपर्क, प्रचार आणि मेहनतीपेक्षा ग्रहदशेवर अधिक विश्वास ठेवणारे काही इच्छुक उमेदवार पाचू, पोवळे, नीलम यांसारख्या रत्नांच्या अंगठ्या विशेष बनवून घेत आहेत. ज्योतिषांकडून कुंडलीतील राजयोग किंवा विजययोग तपासून घेत मंत्रजप, विविध शांत्या किंवा यज्ञयाग असे उपाय करवून घेतले जात आहेत.
नोव्हेंबरपासूनच काहींनी हे उपाय सुरू केल्याचे समजते. काहींनी तर बाबा-बुवांच्या सल्ल्याने मांसाहारी उमेदवारांनीही तात्पुरते उपवास किंवा सात्त्विक आहाराचे पथ्य पाळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी देव, दैवत आणि ग्रहांना खुश करण्याच्या या धडपडीत राजकीय रणनीतीला काही प्रमाणात अध्यात्माची तर काही ठिकाणी अंधश्रद्धेची जोड दिली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.