PMC Election 
पुणे

PMC Election : प्रभाग रचनेवरून पुण्यात राजकीय घमासान! महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत उचललं 'हे' पाऊल

PMC Election : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रभाग रचना व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होत असताना या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी भाजप हस्तक्षेप करत असून त्यासाठी प्रशासनातील नेते त्यांना मदत करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्या पक्षासाठी सोयीचे ठरतील अशा प्रभागांची रचना करणे, राजकीय फायद्यासाठी शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रवृत्त करणे अशा अनेक मार्गाने भाजप सक्रिय झाला आहे. असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनकडून करण्यात आला आहे. या प्रकारात पुणे महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनातील काही घटकांचे सत्ताधाऱ्यांना सहकार्य मिळत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.

प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भाजपचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. तसेच, पुणे शहरातील विविध भागात हेतू पुरस्कार धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याची सत्ताधाऱ्यांची नीती आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेत पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी अशी मागणी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार बापू पठारे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, कमलताई व्यवहारे, वसंत मोरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT