PMC Mayor: पुणे महापालिकेच्या महापौर आरक्षण सोडत उद्या निघणार आहे. त्यामुळं आता महापौर कोण होईल याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. यामध्ये राखीव प्रवर्गानुसार कोणाला ही संधी मिळू शकते याची चर्चाही सुरु झाली आहे. भाजपनं पुणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवल्यानं याच पक्षाचा महापौर होणार हे निश्चित झालं आहे. त्यानुसार, विविध प्रवर्गातून कोणाला महापौरपदी संधी मिळू शकते हे पाहुयात.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ११९ जागांवर विजय मिळाला आहे. महापालिकेतील एकूण १६५ नगरसेवांपैकी ११९ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळं भाजपच्या यादीत दहा जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, गणेश बिडकर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, रोहिणी चिमटे, किरण दगडे पाटील आणि दिलीप वेडे पाटील या नावांची चर्चा आहे.
सर्वसाधारण पुरुष/महिला
धीरज घाटे (प्रभाग क्र. २७)
गणेश बिडकर (प्रभाग क्र. २४)
दिलीप वेडे पाटील (प्रभाग क्रं. १०)
मंजुषा नागपूरे (प्रभाग क्र. ३५)
मानसी देशपांडे (प्रभाग क्र. २०)
--------------------------------
अनुसुचित जाती पुरुष/महिला
श्रीनाथ भिमाले (प्रभाग क्र. २१)
वर्षा तापकीर (प्रभाग क्र. ३७)
---------------------------------
अनुसुचित जमाती पुरुष/महिला
रोहिणी चिमटे (प्रभाग क्र. ९)
--------------------------------
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष/महिला
किरण दगडे पाटील (प्रभाग क्र. १०)
राजेंद्र शिळीमकर (प्रभाग क्र. २०)
--------------------------------------
धीरज घाटे : पुणे शहर भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले धीरज घाटे यांनी प्रभाग २७ मधून भाजपचे थेट पॅनल निवडून आणलं.
श्रीनाथ भिमाले : विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा प्रभाग २१ मुकुंद नगर सॉलिसबरी पार्क मधून श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका निवडणूक लढवून विजय मिळवला.
राजेंद्र शिळीमकर : भाजपचे निष्ठावान म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र शिळीमकर यांनी प्रभाग २० मधून पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळवलं.
गणेश बिडकर : भाजपकडून पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी बिडकर यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाची प्रचार रणनीती, पक्षाचा सर्व्हे, तिकीट वाटपाची जबाबदारी यापासून प्रभाग २४ मधून निवडणूक लढवण्यापर्यंत गणेश बिडकर यांना सर्वच ठिकाणी यश आलं.
मानसी देशपांडे : भाजपच्या मानसी देशपांडे या आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ यांच्या निकटवर्तीय आहेत. प्रभाग २० मधून मानसी देशपांडे यांनी सलग चौथ्यांदा महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
मंजुषा नागपुरे : पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ३५ मधून मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवडणूक झाली आणि महापौर पदाच्या रेसमध्ये त्यांनी त्यांच्या नावाची जागा आघाडीवर आणली.
वर्षा तापकीर : सलग तीन वेळ पुणे महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकाची भूमिका मांडणाऱ्या वर्षा तापकीर यांनी यावेळी सुद्धा प्रभाग ३७ मधून निवडणूक लढवत भाजपचा झेंडा फडकवला.
रोहिणी चिमटे : महापालिका आरक्षणाची सोडत एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीचे निघाले तर भाजपच्या रोहिणी चिमटे यांचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर असणार आहे. पुण्यातील प्रभाग ९ मधून चिमटे यांनी विजय मिळवला आहे.
किरण दगडे पाटील : पुण्यातील प्रभाग १० बावधन भुसारी कॉलनी मधून भाजप समोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आव्हान होतं. मात्र हे आव्हान मोडत किरण दगडे पाटील यांनी तिसऱ्यांदा नगरसेवकपद पटकावलं आहे.
दिलीप वेडे पाटील : प्रभाग १० म्हणून आणखी एक उमेदवार महापौरपदाच्या शर्यतीत आहे ते म्हणजे दिलीप वेडे पाटील. भाजपमध्ये एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.