Ncp News Sarkarnama
पुणे

NCP Leader Crime: 'मी 5 वर्ष नगरसेवक, तुझं घरच पाडतो...'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकानं नागरिकाला धमकावलं, गुन्हा दाखल

NCP Pune News: बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बांधकामाच्या वादातून बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बांधकामाच्या वादातून बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा अडचणीत आले आहे यापूर्वीही मारहाण आणि धमकावल्याचे गुन्हे चांदेरे यांच्यावर दाखल आहेत.

याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी ही तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या राहत्या जागेवर चुलत भावांशी मालमत्तेचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर चालू असलेल्या बांधकामाला महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली होती. तरीही बांधकाम सुरूच ठेवल्याने तक्रारदार कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.

दरम्यान, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे हे त्याठिकाणी आले त्या . लोकांच्या समक्ष अश्लील पणे हातवारे करून माझ्या कार्यकर्त्याचं तु काम थांबवतो का, मला माहीती तु कस घर बांधलेले आहे, मी तुझ चलेज स्विकारतो, मीपण पाच वर्ष नगरसेवक आहे, तुझ घर मी पाडून टाकतो, तू कसा जिंवत राहतो ते बघतो अशी धमकी दिली.

त्यावेळी चांदेरे यांनी सोबतच्या ड्रायव्हरला तो बांबू आण, याचे हातपाय मोडतो,असे सांगून मारहाणीची धमकी दिल्याचाही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT