Baburao Chandere News : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणं भोवलं

Case Filed Against Baburao Chandere : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी रस्त्यात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली.
Baburao Chandere Vijay Raundal
Baburao Chandere Vijay Raundal sarkarnama
Published on
Updated on

Baburao Chandere News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी रस्त्यात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत उचलून फेकले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती 'आप'चे नेते, सामजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत दिली आहे.

कुंभार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'धक्कादायक! माजी पीएमसी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबुराव चांदेरे यांनी त्यांच्या गुंडांसह तीर्थ डेव्हलपर्सचे रौंदळ यांच्यावर क्रूर हल्ला केला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर अखेर एफआयआर दाखल करण्यात आला. न्याय मिळालाच पाहिजे'

Baburao Chandere Vijay Raundal
Shivsena Politic's : संभाजीनगरमध्ये पालकमंत्री शिरसाट अन्‌ खैरेंची हातमिळवणी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या मारहाणी विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षामध्ये असलं काही खपवून घेणार नाही. हे अत्यंत चुकीचा आहे. कुणालाही कायदा हातात घेता येत नाही.मी आज सकाळी बाबुराव चांदेरे यांना फोन केला होता. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही, त्यामुळे त्यांच्या मुलाशी बोलणं झालं, त्यांनी बाबुराव चांदेरे हे बाहेर गेले असल्याचं सांगितलं. तसेच ज्यांना कोणाला मारहाण झाली त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर कारवाई देखील होणार असल्याचे अजित पवार म्हणाले होते.

जमिनीच्या वादातून मारहाण

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विजय रौंदाळ यांना जमिनीच्या वादातून मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तसेच मारहाणी दरम्यान विजय यांच्याकडील मोबाईक काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मारहाणीत विजय यांच्या डोक्याला, गुडघ्याला लागले आहे.

दमानिया यांची टीका

विजय रौंदाळ यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत 'अजित पवार,काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसा ढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली आणि अजून कारवाई नाही?तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात आणि बीड चे देखील आहात. तुमच्या नेत्यांची ही गुंडगिरी बंद करा', असे म्हटले आहे.

Baburao Chandere Vijay Raundal
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या मुजोर पदाधिकाऱ्याला अजितदादांनी भरला सज्जड दम; कारवाई करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com