PMC Nivadnuk 2025 Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी काढली गिरीश बापट, जावडेकर यांची आठवण? काय म्हणाल्या?

PMC Nivadnuk 2025 Supriya Sule:भाजपाकडून यापूर्वी आश्वासन देण्यात आलं होतं. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख येणार होते मात्र ते आले नाहीत. त्या पद्धतीच आश्वासन आम्ही देणार नाही आम्ही दिलेला आश्वासन पूर्ण करू. आमच्या शब्दाला आम्ही पक्के आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढवत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारात खासदार सुप्रिया सुळे कुठे आहेत ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना खासदार सुप्रिया सुळे यादेखील प्रचारात सक्रिय झाल्या असून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये खासदार सुप्रिया सुळे या सक्रिय झाल्या आहे. आज लाल महाल येथून त्यांनी आपल्या प्रचारा सुरुवात केली. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोफत बस आणि मेट्रो प्रवासाच आश्वासन आम्ही दिलेला आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फसवं आश्वासन वाटत असलं तरी जो शब्द आम्ही पुणेकरांना दिला आहेत. तो 100% पाळणार आहोत. मोफत मेट्रो आणि बस प्रवासाबाबत आम्ही तज्ज्ञांकडून सल्ला घेतला आहे. अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे.यामुळे पुणेकरांवर कोणत्याही अतिरिक्त बोजा पडणार नाही.

भाजपा कडून यापूर्वी आश्वासन देण्यात आलं होतं. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख येणार होते मात्र ते आले नाहीत. त्या पद्धतीच आश्वासन आम्ही देणार नाही आम्ही दिलेला आश्वासन पूर्ण करू. आमच्या शब्दाला आम्ही पक्के आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारांना उमेदवारी दिली, अशी टीका केली जात आहे. मात्र मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यातली गुन्हेगारी थांबावी. मात्र पुण्यातली गुन्हेगारी अजून थांबत नाही. कोयता गँगची दहशत सुरूच आहे. महाराष्ट्रात हे सरकार आल्यानंतर गुन्हेगारी वाढली असून त्याबाबत महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे आणि एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून गुन्हेगारीवर चर्चा केली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आजकाल महाराष्ट्रात भाषण कमी आणि इंटरव्यू जास्त होत आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही बहीण-भाऊ काय करतात हे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रात मोठी आव्हान आहे, त्याकडे बघावे.

पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपा पार्टी आहे. मात्र दिवंगत खासदार गिरीश बापट हे आज हवे होते. कारण त्यांनी आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी 2014 मध्ये काँग्रेस विरोधात रान उठवलं होतं. मात्र त्याचं अतिशय सुसंस्कृतपणे कॅम्पेन केलं होतं आज प्रकाश जावडेकर या सगळ्यात कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करत ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकी वेळी भाजपने 400 पारचा नारा दिला होता. जे काय झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे आता भाजपचे पुण्यात 110 जागा फिक्स आहे. यावर माझा विश्वास नाही जर फिक्स असतील तर त्या कशा फिक्स असेल त्यांनी कशा पद्धतीने फिक्स केल्या आहेत हेही पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र राष्ट्रवादीच्या पुण्यात किती जागा येईल मला माहित नाही. मी नंबर वर विश्वास ठेवत नाही पुण्यात महापौर हा राष्ट्रवादीचाच असणार, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT