ZP Teacher Transfer: शिक्षकांसाठी महत्वाची बातमी: 12 हजार शिक्षकांना मिळणार लाभ

Zilla Parishad Inter-District Transfer Process Begin: पेसामध्ये 20 टक्के तर नॅान पेसामध्ये 80 टक्के पदे उपलब्ध आहेत. यामुळे 12 हजार शिक्षकांच्या त्याच्या जिल्ह्यात घरवापसी होणार आहे. तीन वर्षांपासून या बदल्या रखडल्या होत्या. तीन वर्षांपासून स्वगृह जिल्ह्यापासून लांब असलेल्या अन्य जिल्ह्यातील शिक्षक या निर्णयाचा प्रतिक्षेत होते.
ZP Teacher Transfer
ZP Teacher Transfer Sarkarnama
Published on
Updated on

Zilla Parishad Inter-District Transfer Process News: राज्यातील 12 हजार शिक्षकांसाठी महत्वाची बातमी समोर येेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अखेर मागी लागली आहे.

या बदली प्रक्रियेला सुरवात करण्याच्या हालचालींना ग्रामविकास विभागात सुरु आहे. त्यामुळे 31 मे 2026 पर्यंतची रिक्त पदे यासाठी उपलब्ध होतील, शिक्षक भरती प्रक्रियेपूर्वी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील 12 हजार शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. त्यांना मुळ जिल्ह्यात परत येता येणार आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरु होत आहे, 31 मे 2026 पर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीपूर्वी ही आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होईल.

ZP Teacher Transfer
Mahapalica Nivadnuk: 400 रुपये रोज, यायला-जायला गाडी अन् एकवेळचे जेवण; गर्दी जमवण्यासाठी उमेदवारांनी नेमले मुकादम

यासाठी पेसामध्ये 20 टक्के तर नॅान पेसामध्ये 80 टक्के पदे उपलब्ध आहेत. यामुळे 12 हजार शिक्षकांच्या त्याच्या जिल्ह्यात घरवापसी होणार आहे. तीन वर्षांपासून या बदल्या रखडल्या होत्या. तीन वर्षांपासून स्वगृह जिल्ह्यापासून लांब असलेल्या अन्य जिल्ह्यातील शिक्षक या निर्णयाचा प्रतिक्षेत होते.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी स्वतंत्र वेळापत्रक करण्यात यावे यावे,आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही शिक्षक भरती पूर्वी राबविण्यात यावी, काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसल्यास तेथे शून्य बिंदू नामावली गृहीत धरून अशा शिक्षकांच्या स्वगृही बदल्या करण्यात याव्यात. या प्रमुख मागण्या शिक्षकांच्या आहेत.

याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे शिक्षक संघटनांचा पाठरपुरावा सुरु होता. प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com