PMC News Sarkarnama
पुणे

PMC News: स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीचा मुहूर्त ठरला! भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे नाव आघाडीवर

PMC Standing Committee Chairman election:  पुणे महापालिकेत स्थायी समिती सह ७ विषय समित्या अस्तित्वात आल्या आहेत. या समित्यांवर सदस्य नियुक्त करण्यात आले आहे. आता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

Mangesh Mahale

PMC News: महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. २३) सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यासाठी स्थायी समितीच्या विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके हे पीठासीन अधिकारी असणार आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती, महिला बाल कल्याण समिती, नाव समिती, विधी समिती या समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहेत. स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत.

त्यापैकी १२ सदस्य भाजपचे असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहेत. भाजपतर्फे श्रीनाथ भिमाले यांचे नाव अध्यपदासाठी निश्चित असल्याचा पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला जात आहे. या निवडणुकीसाठी विरोधीपक्ष उमेदवार देणार की बिनविरोध करणार याकडे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज हे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी ही माहिती दिली. पुणे महापालिकेत स्थायी समिती सह ७ विषय समित्या अस्तित्वात आल्या आहेत. या समित्यांवर सदस्य नियुक्त करण्यात आले आहे.

आता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यानंतर बाकी समित्यांचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.

१६ सदस्यांच्या स्थायी समितीत १२ सदस्य भाजपचे असल्याने समिती अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. पक्षाकडून रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, श्रीनाथ भिमाले, मयूरी कोकाटे, डॉ. दादा कोद्रे, वृषाली कामठे, निशा मानवतकर आणि संदीप बेलदरे यांची नियुक्ती केली आहे.

या नगरसेवकामध्ये भिमाले हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असल्याने अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने महापौर निवड बिनविरोध करावी, अशी विनंती काँग्रेस, तसेच राष्ट्रवादीला केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT