Ajit Pawar Death: अजितदादा, कोकोटेंनी दिलेली स्थगिती कोणी उठवली? नामांकित शाळा कशा झाल्या अल्पसंख्याक....

Alleged certificate distribution during mourning holiday: शासकीय सुटी असतानाच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी 75फायलींवर सह्या केला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुणाच्या आदेशाने या सह्या करण्यात आल्या, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.
Ajit Pawar Death
Ajit Pawar DeathSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Minority Department: काही सरकारी अधिकारी किती असंवेदनशील असतात, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त तीन दिवसांचा दुखवटा असतानाच, शासकीय सुटी असतानाच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी 75फायलींवर सह्या केला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कुणाच्या आदेशाने या सह्या करण्यात आल्या, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. या फायलींवरील सह्यांमुळे नामांकित शाळा या अल्पसंख्याक शाळा झाल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यापासून या फायलींवर स्थगिती होते, ज्या विभागाशी संबधीत या फाईंल होत्या त्या विभागाचे मंत्री म्हणून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे त्यावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत होते. त्या फायलींवर अजितदादांच्या निधनाच्या दिवशीच सह्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. स्थगिती उठवण्याचा आदेश कुणी दिला, यामागे कुणी राजकीय नेत्यांचा हात आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहेत.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death: निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचे कारनामे! अजितदादांच्या निधनाच्या दिवशीच केल्या 75 फाईलींवर सह्या; अधिकारी कोण?

यानिमित्ताने उपस्थित करण्यात येणारे प्रश्न

-अजितदादा यांच्या निधनाने शासकीय दुखवटा जाहीर झाला असताना इतक्या लवकर घाईन सह्या करुन निर्णय का घेतला?

-या विषयाबाबत अहवाल येईपर्यंत स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती २८ जानेवारीला कोणाच्या आदेशाने उठवण्यात आली?

-अल्पसंख्यांक शाळांना परवानगी दिल्याच्या तारखा या तीन दिवसाच्या दुखवट्याच्या तारखांमध्ये असल्याने हे कारस्थान कुणी केले?

-अल्पसंख्यांक खात्याचे तत्कालिन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागवलेला अहवाल २८ जानेवारी रोजी आला होता का?

-अहवाल असेल तर कुणाला विचारुन स्थगिती उठवण्यात आली.

निर्णयाला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com