Pune News : मणिपूर जळत असल्याकडे बोट दाखवत 'पुणे नहीं, मणिपूर जाओ'... अशा घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला शिवसेनेनेही विरोध केला. दुसरीकडे या दौऱ्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पुण्यात मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता वाढली असतानाच विरोधकांनी आपली ताकद दाखवून दिली.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात झालेल्या काँग्रेसच्या माजी आमदार दिप्ती चवधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे यांच्यासह पक्षाचे पधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्काराला विरोधी पक्षांतून शिवसेना आणि कॉंग्रेसने विरोध केला. मणिपूरमध्ये हिंसाचार दिवसागणिक उसळत असताना मोदी तिकडे जाण्याऐवजी पुण्यात येऊत पुरस्कार घेत आहेत. त्याचवेळी समृध्दी महामार्गावरील अपघात १७ जणांचा मृत्यू झाला आहे, या घटना पाहता मोदींनी आपला पुणे दौरा मागे घ्याया त्यांनी पुण्यात येऊ नये. मणिपूर शांत करून तेथील लोकांना न्याय देण्यासाठी मोदींनी मणिपूरला जावे, अशी अपेक्षा अंधारेंनी व्यक्त केली.
मोदींचा पुणे दौरा गाजत असून, त्यावरून राजकीय वर्तुळात धुरळा उडत आहे. अशात मोदींच्या दौऱ्यातील पहिलावहिला कार्यक्रम नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीने होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या पुरस्कारच्या कार्यक्रमात व्यासपिठावर बसण्याची शक्यता आहे. पवार यांची भूमिका कॉंग्रेसला पटलेली नाही आणि शिवसेनेला पचलेली नाही. मोदी-पवारांच्या एकत्र येण्यावरून शिवसेनेने पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Edited By-Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.