PM Modi Pune Visit Schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेमका कसा असणार पुणे दौरा ?

PM Modi Pune Daura Schedule: मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी टिळक पुरस्काराने मोदींना सन्मानित करण्यात येणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आहेत. मोदींच्या या दौऱ्याची जय्यत झालेली असून ते सकाळी आल्यानंतर दुपारी पुन्हा दिल्लीला जाणार आहे. (Latest Political News)

मोदी येणार असल्याने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. शहरातील अनेक रस्ते सकाळी सहा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले विरोधकांच्या पार्श्वभूमिवर पुण्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Narendra Modi
Sanjay Raut On Sharad Pawar : मोदींशेजारी बसण्याआधीच संजय राऊतांनी पवारांना 'असे' अडकवले...

विविध कार्यक्रामांचे आयोजन

पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करणार आहेत. पूजेनंतर मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचेही लोकार्पण मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 'वेस्ट टू एनर्जी' संयंत्राचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Narendra Modi
Karad News : बावनकुळेंच्या वक्तव्यावर पृथ्वीराजबाबांचे 'नो कॉमेंट..' म्हणाले, मी अडचणीत आलो....

असा असणार पंतप्रधान मोदींचा दौरा

  • सकाळी १०.१५ लोहगाव विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार आहे.

  • सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील 'हेलिपॅड'वर येतील.

  • सकाळी १०.५५ मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहे.

  • सकाळी ११ ते ११.३० ला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात ते पुजा करणार आहेत.

  • सकाळी ११.४५ वाजता मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

  • दुपारी १२.४५ वाजता विविध विकासकामांचे मोदींच्या हस्ते उदघाटन आणि भूमिपूजन होईल.

  • दुपारी १.४५ ते २.१५ हा वेळ कार्यक्रमांसाठी राखीव आहे.

  • दुपारी २.२५ कृषि महाविद्यालयाच्या मैदानवरील 'हेलिपॅड'वर येतील.

  • दुपारी २.५५ वाजता मोदी दिल्लीकडे प्रस्थान होईल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com