Satish Wagh Murder Case Sarkarnama
पुणे

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ खून प्रकरणातील पोलिसांना गुंगारा देणारा पाचवा आरोपी अटकेत

Satish Wagh News Update : भाजपचे आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. वाघ यांचा खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघयांच्या खून प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वाघ यांचा खून केल्यानंतर पोलीस सातत्याने आरोपीच्या मागावर होते. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार आरोपी आतिश जाधव याला धाराशिवमधील कळंब येथून पोलिसांनी पकडेल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. आरोपी आतिश हा धाराशिवमधील उंबरे कोटा येथील रहिवाशी असून त्याचा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ खून प्रकरणात सहभाग होता.  

वाघ यांचे अपहरण करून त्यांचा उरुळी कांचन भागातील शिंदेवणे घाटात खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. फ्लॅट नंबर २०१ लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८,  रा. बजरंग नगर, बाजार तळ्याशेजारी, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) यांना अटक केली आहे. तर अतिश जाधव याचा शोध घेण्यात येत होता.  

पोलिसांना फरार जाधव हा धाराशिव परिसरात असल्याची माहिती  मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले  आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा  वाघ हे नऊ डिसेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाले होते.तेव्हा त्यांचे अपहरण करून खून करण्यात आले होता.

आर्थिक वादातून वाघ यांचे अपहरण करून आरोपींनी खून केला असल्याचे तापासात समोर आले आहे. वाघ यांच्याकडे असलेल्या भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी देवून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT