Dada Bhuse : शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

Minister Dada Bhuse School Visit Discussion: जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांसोबत बसून संवाद साधल्याने मंत्री भुसे यांची व्हिजिट चर्चेत.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News: शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मालेगाव शहरात दणक्यात स्वागत झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीने अक्षरशः रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. मंत्री भुसे यांनी मात्र स्वागत आणि सत्कारात न रमता भेट कामकाजालाही सुरुवात केली.

शिक्षण मंत्री भुसे यांनी काल आपल्या समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री भिसे यांचे स्वागत केले.

यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. थेट ॲक्शन मोडवर आलेले शिक्षण मंत्री पाहून शाळेच्या शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. शिक्षण मंत्र्यांनी मतदारसंघातील देवारपाडे, भिलकोट, गुगुळवाड, सातवहाळ, चिखल ओहोळ येथील शाळांना थेट भेटी दिल्या.

Dada Bhuse
Hasan Mushrif : इचलकरंजीत महाविकास आघाडीला धक्का,' ही' आघाडी बाहेर पडून जाणार महायुतीत

चिखल ओहोळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी चौथीच्या वर्गाला भेट दिली यावेळी शिक्षण मंत्री भुसे हे महेश शिंदे या विद्यार्थ्याच्या बेंचवर बसून त्याच्याशी बोलले महेश शिंदे या विद्यार्थ्याला त्यांनी काय शिकता काय विषय आवडतो, कविता आवडतात काय असे विविध प्रश्न विचारले यावेळी शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीतील कविताही म्हणायला लावल्या विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्यावर त्यांनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या पाठीवर थाप देखील दिली.

शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि शाब्बासकी देत असल्याने शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला. यावेळी शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्याविषयी सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.इंग्रजी शाळांची लोकप्रियता अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे. पालकांचाही त्याकडे ओढा असल्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे यासाठी काही विशेष कार्यक्रम राबविण्याचा माझा मानस आहे.

Dada Bhuse
Rahul Gandhi : त्यांनी आमच्या निळ्या क्रांतीला फॅशन शो बनवला... हा नेता राहुल आणि प्रियंका गांधींवर भडकला

या संदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात येईल. त्याद्वारे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांच्या आणि विशेषता जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम मी शक्य तितक्या लवकर आणि प्राधान्याने हाती घेईन असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com