Manorama Khedkar Sarkarnama
पुणे

Manorama Khedkar : 'वेळेवर खायला मिळत नाही'; मनोरमा खेडकरांनी वाचला तक्रारींचा पाढा

Sudesh Mitkar

Pune News : वादग्रस्त ट्रेनिंग आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. मुळशी येथील शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे.

मनोरमा खेडकर Manorama Khedkar यांनी काही दिवसांपूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवत स्थानिक शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस मनोरमा खेडकर यांचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्यांना खेड येथील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली.

या प्रकरणी पोलिसांना कोर्टाकडे त्यांच्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावेळी खेडकर यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर आता मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना तीन दिवसाचे पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

सरकारी पक्षाने सुनावणीदरम्यान दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्या मागणीला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. युक्तिवाद करताना सरकारी वकील अमर ननावरे यांनी मनोरमा खेडकर यांचे साथीदार, तसेच घटनास्थळावरील कंटेनर संबंधीचा तपास पोलिसांना करायचा असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे आरोपीने तक्रारदारांच्या डोक्याला पिस्तूल लावले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. यावर आरोपीचे वकील सुधीर शहा यांनी या प्रकरणांमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 लागू होत नाही. ते कलम काढून टाकावे. उर्वरित कलमे जमीनपात्र आहेत. त्यामुळे पोलिस कोठडी वाढवण्यात येऊ नये, असा युक्तिवाद केला. यावर कोर्टाने मनोरमा खेडकर यांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे.

सुनावणी दरम्यान मनोरमा खेडकर यांनी त्यांना वेळेवर खायला दिले जात नसल्याची तक्रार कोर्टासमोर केली. सकाळी चहा उशिरा दिला त्याचप्रमाणे दुपारचे जेवणही उशिरा दिले जाते. त्यावर कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT